Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करायचंय? घ्या ‘हे’ अतिशय सोपे आणि छोटं 26 जानेवारीचे भाषण

Republic Day Speech in Marathi: भारतात दरवर्षी २६ जानेवारीला ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रजासत्ताक दिनाची झलक दिल्लीतील राजपथवर पाहायला मिळते. याशिवाय देशातील सर्व शाळांमध्ये आणि अनेक सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये भाषणेही आयोजित केली जातात. जर तुम्हाला 26 जानेवारीला भाषण करायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे सर्वोत्तम भाषण घेऊन आलो आहे, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. एवढंच नव्हे हे अतिशय सोपे आणि सुटसुटीत असेल, जे तुम्ही सहज सादर करु शकता. 

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण नमुना 1

प्रिय देशवासियांनो,

प्रजासत्ताक दिन 2024 च्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आज 26 जानेवारी 2024 रोजी आपण सर्वजण एका खास दिवसाची आठवण ठेवण्यासाठी येथे जमलो आहोत. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की, आपण एकत्र आहोत आणि एकाच भारतीय कुटुंबाचे सदस्य आहोत. त्याच वेळी, आम्ही एक नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र पुढे जात आहोत, या जबाबदारीची जाणीव करुन देणारा हा दिवस आहे. 

भारतामध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी 1950 साली भारतीय राज्यघटना लागू झाली आणि भारतीय प्रजासत्ताकची स्थापना झाली. हा दिवस त्या महापुरुषांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळूनही देशाला एक मजबूत आणि समृद्ध प्रजासत्ताक बनवण्यासाठी काम केले. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर भारत प्रजासत्ताक बनला.

हेही वाचा :  Republic Day speech in Marathi : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या हे सोपं आणि छोटं भाषण, सहज होईल पाठ

या दिवशी परेडचेही आयोजन केले जाते. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. या दिवशी लोक विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या देशाप्रती त्यांच्या समर्पणाचे नूतनीकरण करतात. आपली राज्यघटना आपल्याला याची आठवण करून देते की आपण सर्व समान आहोत आणि एकाच देशाचे नागरिक आहोत. आपले कर्तव्य बजावून पुढील पिढ्यांचे चांगले भविष्य घडवायचे आहे.

अशा परिस्थितीत या दिवशी आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे की, आपण आपले राष्ट्र आणखी मजबूत करू आणि सर्व नागरिकांना न्याय आणि समानतेच्या भावनेने जगण्याची अधिक संधी देऊ. या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या देशाला नव्या उंचीवर नेऊ आणि एकत्र येऊन सशक्त भारत घडवू.

धन्यवाद

जय हिंद!

(हे पण वाचा – Republic Day 2024 Wishes : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीची भावना व्यक्त करण्यासाठी मराठीतून पाठवा ‘या’ शुभेच्छा…) 

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण नमुना 2

प्रजासत्ताक दिनी भाषण करण्यापूर्वी स्टेजवर पोहोचल्यानंतर, सर्वप्रथम अभिवादन करा, स्वागत करा आणि प्रमुख पाहुण्यांसह सर्व उपस्थितांना आपला परिचय द्या. यानंतर तुमचे भाषण सुरू करा.

आज आपण सर्वजण 26 जानेवारी ‘प्रजासत्ताक दिन’ हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. जो आपल्याला एक मजबूत राष्ट्र म्हणून पुढे जाण्यासाठी धैर्य आणि प्रेरणा देतो. हा दिवस आपल्याला भारतीय प्रजासत्ताक स्थापनेची आठवण करून देतो. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली हे आपणा सर्वांना माहीत आहे. तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा :  Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?

स्वातंत्र्याच्या वेळी भारताकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते, परंतु नंतर खूप विचारविनिमय केल्यानंतर डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचा हा मसुदा विधान परिषदेत सादर करण्यात आला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आला, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी तो लागू झाला.

या दिवशी आपण त्या महापुरुषांचे स्मरण करतो ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळेच आज भारताला प्रजासत्ताक म्हटले जाते. आपले महान भारतीय नेते आणि स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाल बहादूर शास्त्री इत्यादींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.

या वर्षी आपण 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक म्हणजे देशात राहणाऱ्या लोकांची सर्वोच्च शक्ती आणि देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी राजकीय नेते म्हणून त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार फक्त जनतेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अधिकारांमुळेच आपण देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आपल्या आवडीचे इतर नेते निवडू शकतो.

हेही वाचा :  SBI Internet Banking वापरणाऱ्यांनो लक्ष द्या, 'या' चुकांची मोजावी लागेल मोठी किंमत, असे राहा सेफ

आपल्या महान भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी भारतात “संपूर्ण स्वराज्य” साठी 200 वर्षांहून अधिक काळ संघर्ष केला आहे. आपल्या भावी पिढ्या कोणाच्याही गुलाम राहू नयेत आणि आपले हक्क मोकळेपणाने वापरू शकतील यासाठी त्यांनी हे केले.

आपण सर्वांनी प्रतिज्ञा करायची आहे की, आपणही आपले कर्तव्य पार पाडू आणि येणाऱ्या पिढ्यांचे चांगले भविष्य घडवू. भारताला एक मजबूत राष्ट्र बनवू. आपण मिळून एक मजबूत भारत घडवू. सर्व नागरिकांना संविधानाची जाणीव करून देईल आणि सर्वांना समानतेने जगण्याची संधी देईल. गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, ग्लोबल वॉर्मिंग, असमानता इत्यादी सामाजिक समस्यांबद्दल आपण जागरूक असले पाहिजे जेणेकरून ते पुढे जाण्यासाठी सोडवता येतील.

धन्यवाद
जय हिंद! भारताचा विजय…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …