Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?

Republic Day 2024: उद्या म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्यासाठी सगळीकडेच जोरात तयारी सुरु झाली आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरातील सगळ्या सेना यासाठी खाय तयारी करत आहेत. संपूर्ण भारत उद्या तिरंग्याच्या रंगात आपल्याला पाहायला मिळेल. या खास दिवशी देशाची राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथवर सेना एक खास परेड करते. कर्तव्य पथ की राजपथ तुम्हालाही प्रश्न पडला असेलच, तर कर्तव्य पथला आपण सुरुवातीला राजपथ या नावानं ओळखायचो. आता दरवर्षी कर्तव्य पथावरच नेहमी परेड का करण्यात येते असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? चला तर जाणून घेऊया त्याचं कारण

कधी लागू झालं संविधान?

2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस मेहनत घेतल्यानंतर अखेर 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या देशाचं संविधानाला सभेनं स्विकारलं. त्यानंतर पुढच्याचवर्षी 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्या देशात संविधान लागू झालं. 

कर्तव्य पथावरचं का होते परेड? 

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात कर्तव्य पथाची महत्त्वाची भूमिका आहे. या जागेला सुरुवातीला किंग्सवे नावानं ओळखायचे. हा परिसर देशाची राजधानी नवी दिल्लीचं हृदय म्हटल्या जाणाऱ्या ‘केंद्र’ म्हणजेच सेंटरवर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंग्सवेचं नाव बदलत त्याला राजपथ असं नाव देण्यात आलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या सात दशकांपर्यंत दरवर्षी येथेच प्रजासत्ताक दिना निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

हेही वाचा :  पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षांची कैद, 1 कोटींचा दंड ! पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 आहे तरी काय?

राष्ट्रपति भवन ते इंडिया गेटपर्यंतचा परिसर देशाच्या इतिहासात महत्त्वाच्या स्थानी आहे. ब्रिटिशांनी देशावर केलेलं राज्य ते स्वातंत्र्य हा संपूर्ण प्रवास कर्तव्य पथानं पाहिला असून या सगळ्या प्रवासाचं ते प्रतिक आहे. या कारणामुळे कर्तव्य पथावर दरवर्षी स्वातंत्र्य दिनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 

हेही वाचा : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलां-मुलींची हटके नावे, कायमच स्मरणात राहिल देशप्रेम…

कुठून सुरु होते आणि कुठे संपते प्रजासत्ताक दिनाची ही परेड? 

1955 पासून कर्तव्य पथावर नियमितपणे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तर परेडची सुरुवात ही रायसिना हिल्सपासून सुरु होते आणि राजपथ, इंडिया गेटपासून लाल किल्ल्याला जाऊन संपते. दरम्यान, सप्टेंबर 2022 मध्ये राजपथचं नाव बदलण्यात आलं. तेव्हा पासून राजपथला ‘कर्तव्य पथ’ असं नाव देण्यात आलं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर लोकांचा विश्वास उडून जाईल,’ सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, ‘कसं काय तोंड द्यायचं?’

राज्य शालेय सेवा आयोगाच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेववरील सुनावणीदरम्यान …

‘कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की…’; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक …