Ramadan 2023 : 24 तासात 16 सूर्यास्त…; रमजानमुळे स्पेस स्टेशनवरील ‘तो’ अंतराळवीर संभ्रमात

Ramadan 2023 : संपूर्ण जगभरात नुकतीच पवित्र रमजान (Ramadan) महिन्याची सुरुवात झाली आहे. मुस्लिम धर्मीयांसाठी अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या महिन्यामध्ये बरेच मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. दिवसभर अन्न- पाण्याशिवाय राहतात. (Ramadan Roja) रोजा सोडताना अनेक लज्जतदार पदार्थांची थाळी समोर ठेवून इफ्तारी (Iftari) केली जाते. महिनाभर हीच दिनचर्या ही मंडळी पाळताना दिसतात. यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताचं (Sunset) फार महत्त्वाचं स्थान. दिवसभरात म्हणजेच चोवीस तासांत तुम्हीआम्ही एकदा सूर्योदय होताना पाहतो आणि एकदा सूर्यास्त होताना पाहतो. पण, समजा तुम्हाला एकच सूर्यास्त अनेकदा दिसला तर…? 

कसं शक्य आहे? 

पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश आणि दिनमान पाहता 24 तासांचा एक दिवस होतो. पण, अंतराळात मात्र चित्र प्रचंड वेगळं असतं. पृथ्वीभोवती 27,600 किमी प्रतीतास इतक्या वेगानं फिरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या ( International Space Station) प्रयोगशाळेतून हे अदभूत चित्र पाहायला मिळतं. 

3 मार्च रोजीच अंतराळात गेलेल्या UAE च्या Sultan Alneyadi या अंतराळवीराला यासंबंधीचाच एक प्रश्न विचारला गेला. ज्यावेळी आपले बांधव पृथ्वीवर रमजानचे रोजे ठेवत आहेत. त्याचवेळी Alneyadi मात्र अंतराळात आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे.

हेही वाचा :  'मी जरांगेंना समोरच सांगितलं की..'; राज ठाकरेंचा खुलासा! म्हणाले, 'मराठा बांधवांना एकच विनंती..'

रमजानचा रोजा ठेवणं त्याला जमतं? 

आता राहिला मुद्दा रमजान आणि रोजाचा, तर Alneyadi च्या सांगण्यानुसार तो 24 तासांच 16 सूर्यास्त पाहतो. त्यामुळं रोजा ठेवणं त्याच्यासाठी अत्यंत आव्हानाचीच बाब.  त्यामुळं या उपवासांपासून तो दूर राहताना दिसतो. अंतराळात असताना त्यानं रोजा ठेवणं अपेक्षित नाही. कारण, प्रकृती अस्वास्थ्य असताना उपवास ठेवण्याची कोणतीही सक्ती नसते, असं त्यानं एका संवादादरम्यान स्पष्ट केलं. 

आपली मोहिम धोक्यात टाकेल किंवा आपल्या सोबत असणाऱ्या इतर अंतराळवीरांना धोका उदभवेल अशी कृती अंतराळात करणं अपेक्षित नसतं. कारण, त्यांना पृथ्वीपासून कैक मैल दूर, आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसा आहार करण्याचा आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्व पुरवण्याचाच सल्ला देण्यात येतो. 

इथंही Alneyadi नं आपण सुवर्णमध्य साधल्याचं फेब्रुवारी महिन्यात मोहमेआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं होतं. आपण ग्रीनवीच मीन टाईम, युनिवर्सल टाईम किंवा अंतराळात पाळल्या जाणाऱ्या टाईम झोनच्या आधारे उपवास करु शकतो असं त्यानं स्पष्ट केलं होतं. 

हेही वाचा :  नवऱ्याला संपवले, कर्जतच्या जंगलात पुरले, मग पोलिसांत तक्रार द्यायला गेली अन् अडकली

Ramadan 2023 Astronaut Sultan Alneyadi watches 16 sunsets in 24 hours on space station this is how he is fasting in ramzan

इतिहास काय सांगतो? 

Alneyadi च्या आधीसुद्धा अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांनी त्यांच्या परीनं धार्मिक रुढीपरंपरांचं पालन केलं आहे. 2007 मध्ये  Sheikh Muszaphar Shukor हा ISS मध्ये जाऊन वास्तव्य करणारा पहिला मुस्लिम अंतराळवीर ठरला होता. त्यावेळी देशातील इस्लामिक काऊन्सिलनं त्याला गुडघ्यांवर बसून नमाज पठण न करण्याची मुभा दिली होती. शून्य गुरुत्वाकर्षणात नमाज पठणादरम्यान येणाऱ्या अडचणी पाहून हा निर्णय घेण्यात आला होता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …