Neal Mohan : भारतीय वंशाचे नील मोहन बनले YouTube चे नवे बॉस! सुंदर पिचाई यांच्यासोबत करणार काम

YouTube CEO : जगभरात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबचे (YouTube) व्यवस्थापकीय संचालक (सीईओ) सुसान वोजिकी (Susan Wojcicki) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी ही माहिती दिली आहे. सुसान यांच्या जागी आता भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे पुढील सीईओ (CEO) असतील. नील मोहन (neal mohan) यूट्यूबच्या वरिष्ठ उपाध्यक्षाची भूमिकाही पार पाडणार आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

सुसान वोजिकी 25 वर्षांपासून गुगलमध्ये नोकरी केली आहे. दुसरीकडे नऊ वर्षांनंतर त्यांनी यूट्यूबच्या सीईओपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता भारतीय-अमेरिकन नागरिक असलेले नील मोहन हे गुगलच्या व्हिडिओ सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी यूट्यूबचे पुढील सीईओ असणार आहे.

नील मोहन आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अॅडोबचे सीईओ शांतनु नारायण आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह यूएस जागतिक दिग्गजांच्या भारतीय वंशाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यादीत सामील होतील. इंद्रा नूयी यांनी 2018 मध्ये पायउतार होण्यापूर्वी 12 वर्षे पेप्सिकोच्या सीईओ म्हणूनही काम केले. नील मोहन सध्या यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये तो यूट्यूबशी जोडले गेले होते. नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आहे आणि त्याने एक्स्चेंज कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. 

कोण आहेत नील मोहन?

हेही वाचा :  रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू...

नील मोहन स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत. नील मोहन यांनी यूट्यूबला एक सर्वोच्च उत्पादन बनवण्यात आणि UX टीमची स्थापना करण्यात मोठे योगदान दिले आहे. यूट्यूब, TV, YouTube Music आणि Premium आणि Shorts व्हिडिओंसह काही सर्वात मोठी उत्पादने लाँच करण्यात मोहन यांचा मोलाचा वाटा आहे.

मोहन यांनी मायक्रोसॉफ्टमध्येही काम केले आहे. नील मोहन हे स्टिच फिक्स, जीनोमिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी 23andMe च्या बोर्डवर देखील आहेत. मोहन यांनी सुमारे सहा वर्षे डबलक्लिकमध्येही काम केले आहे. ही कंपनी 2007 मध्ये Google ने विकत घेतली होती. त्यानंतर मोहन यांनी जवळपास आठ वर्षे गुगलच्या व्हिडिओ जाहिरात शाखेत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …