
व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून यामुळे तणावर आणखी वाढण्याची भीती आहे. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
लुहान्स आणि डोनेस्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व युक्रेनमधील रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावादी भागांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्यासाठी व्लादिमिर पुतीन यांनी सोमवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं.
विश्लेषण : रशियन बंडखोर का ठरू लागलेत युक्रेनसाठी डोकेदुखी?
लोकसत्ता विश्लेषण: रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर भारतावर काय परिणाम होतील?
आपल्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी आणि युक्रेनच्या कथित लष्करी आक्रमणाविरुद्ध संरक्षणासाठी लष्करी मदतीची तरतूद करणाऱ्या मैत्रीच्या करारांवर स्वाक्षऱ्या कराव्या अशी विनंती फुटीरतावादी नेत्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर पुतीन यांना केली होती. दरम्यान रशियाने जनतेला संबोधित करताना युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला .
विश्लेषण : भारतीय दूतावासाने भारतीयांना युक्रेन सोडण्याचा का दिला सल्ला?
दरम्यान युक्रेनमधील चकमकींचा बहाणा करून रशिया कुठल्याही क्षणी युक्रेनवर आक्रमण करू शकतो अशी भीती पाश्चिमात्य देश व्यक्त करत असतानाच अध्यक्षीय सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली.
पुतीन यांच्याशी चर्चेची बायडेन यांची तयारी
युक्रेनच्या उत्तर सीमेवरून सैन्य मागे घेण्याची तयारी आधी रशियाने दाखविली होती, पण तसे घडत नसल्याने रशिया युक्रेनवरील नियोजित आक्रमणाच्या दिशेने एक पाऊल पुढे आला असल्याचे अमेरिकेच्या नेत्यांनी म्हटले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मध्यस्थीने अखेरच्या क्षणी राजनैतिक प्रयत्न करण्यात आल्यानंतर जोवर रशिया हल्ल्याचा मनसुबा प्रत्यक्षात आणत नाही, तोवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे व्हाइट हाऊसने सांगितले.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या
