वडिलांचे करतात सायकल रिपेअरिंगचे काम ; आता लेक बनली PSI | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

MPSC PSI Success Story : माणूस बिकट परिस्थितीतून मार्ग काढायला शिकला की त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. केवळ मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तो ध्येय साध्य करू शकतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पीएसआय लावण्या जक्कन. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल तब्बल साडेतीन वर्षाच्या कालावधीनंतर जाहीर झाला आहे. ‘ज्या दिवशी मी अंगावर खाकी वर्दी चढवेल ना, त्या दिवशी माझी मरणाची भीती संपेल. महाराष्ट्र पोलीस हा धर्म आणि जात फक्त खाकी…’ हे स्टेटस तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याच्या आधीपासूनच ठेवलं होतं, ते आज सत्यात उतरलं. लावण्या जक्कन ही त्यांच्या कुटुंबात ग्रॅज्युएट होणारी पहिली मुलगी आहे.

लावण्या देविदास जक्कन ही नगर शहरातील तोफखाना परिसरात राहते. लावण्याचे वडील मागील ३० वर्षांपासून सायकल रिपेअरिंगचं छोटसं दुकान चालवत होते. मात्र त्यांचा अपघात झाल्यामुळे ते आता गोळ्या बिस्कीटांची टपरी चालवतात. लावण्याची आई ही लावण्या आणि तिचा भाऊ लहान असतानाच आजारपणामुळे घर सोडून माहेरी गेल्या.

त्यावेळी लावण्या केवळ ५ वर्षांची होती. लावण्याचं प्राथमिक शिक्षण सीताराम सारडा विद्यालयात झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण न्यू आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालायात झालं. आपल्या अवतीभवती अनेक मुली ती पोलीस दलात पाहत होती. आपल्याला पण खाकी वर्दी मिळायला पाहिजे, आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे म्हणून तिने स्पर्धा-परीक्षांकडे आपला मोर्चा वळवला आणि पहिल्याच प्रयत्नात ती पोलिस उपनिरीक्षक झाली.

हेही वाचा :  NMH मार्फत नाशिक येथे विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती 

तिच्या शिक्षणात तिच्या आजी आजोबांचा सिंहाचा वाटा असल्याचं ती आवर्जून सांगते. तिच्या आजीचे बिड्या बनवण्याचं काम करून तिच्या शिक्षणाला हातभार लावला. आजोबांनी नेहमी प्रोत्साहन दिलं. कुटुंबात एकच मुलगी शिकलेली होती ती म्हणजे लहान आत्या. त्यांचं नेहमी मार्गदर्शन लावण्याला लाभलं. एकत्र कुटुंब असल्यामुळे वडापावची गाडी चालवून लावण्याचे चुलते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

शाळेत फार हुशार नसणाऱ्या लावण्याला सुरुवातीला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अवघड गेला. पण तिचं ध्येय वर्दीचं होतं आणि आपल्याला कोणी कमी लेखलं नाही पाहिजे म्हणून तिने हार न मानता जिवाचं रान करून अभ्यास केला. तिला मित्र-मंडळीचं आणि योग्य शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. १४ ते १५ तास लावण्या अभ्यास करत होती. घरातली थोडफार कामं आवरून ती अभ्यासाला बसायची. यात तिने यूट्यूबची मदत घेतली. प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर ती पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. बिकट परिस्थितीतही तिने हे यश संपादन केल्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …