Police Bharti Syllabus 2022 : महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम २०२२ | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Police Bharti Syllabus : अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17130  जागांसाठी पोलीस भरतीची जहिरात निघाली आहे. ही भरती पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणार आहे. त्यानुसार तुम्ही देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोलीस भरती २०२२ च्या लेखी परीक्षेचे पूर्ण सिल्याबसची माहिती देणार आहोत. Police Bharti Syllabus ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

महत्वाचे म्हणजे या भरतीसाठी पहिले मैदानी/शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. पहिले मैदानी किवा शारीरिक चाचणीसाठी रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणत सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांना बोलावण्यात येईल. लेखी परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमुद केलेल्या दिनांकास परिक्षा सुरु होण्यापुर्वी परिक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थीत राहावे लागेल. सदरहु लेखी परिक्षा होण्यासाठी उमेदवारांस 40 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. Maharashtra Police Bharti Syllabus

लेखी चाचणीचा कालावधी
लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. (Negative Mark सिस्टीम असणार नाहीत.)

पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप | Police Bharti Exam Process

महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

शारीरिक चाचणी

पोलीस शिपाई :

हेही वाचा :  दिव्याखाली बसून केला अभ्यास अन् अंशुमन झाला IAS अधिकारी !

शारीरिक चाचणी :
पुरुष :
1600 मीटर धावणे : 20 गुण
100 मीटर धावणे : 15 गुण
गोळाफेक : 15 गुण
एकूण गुण : 50 गुण

महिला :
800 मीटर धावणे : 20 गुण
100 मीटर धावणे : 15 गुण
गोळाफेक : 15 गुण
एकूण गुण : 50 गुण

चालक पोलीस शिपाई :

चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.

पुरुष उमेदवार :
1600 मीटर धावणे : 30 गुण
गोळाफेक : 20 गुण
एकूण गुण : 50 गुण

महिला :
800 मीटर धावणे : 30 गुण
गोळाफेक : 20 गुण
एकूण गुण : 50 गुण

पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :
शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :
(अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण
(ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण
कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

लेखी चाचणी:

पोलीस शिपाई पदाकरीता :

शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

हेही वाचा :  कष्टाला पर्याय नाही ; अमळनेरच्या अर्चनाची MPSC मार्फत मुख्याधिकारी पदी निवड!

लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:
१) अंकगणित; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
३) बुध्दीमत्ता चाचणी; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
४) मराठी व्याकरण (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट

चालक पोलीस शिपाई पदाकरीता :

शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :
१) अंकगणित
२) सामान्यज्ञान व चालू घडामोडी
३) बुध्दीमत्ता चाचणी
४) मराठी व्याकरण आणि
५) मोटार वाहन चालविणे / वाहतुकीबाबतचे नियम
एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट

महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम | Police Bharti Syllabus

विषय : गणित
महत्वाचे घटक :
संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे.

हेही वाचा :  परिस्थितीमुळे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले‌ ; अखेर कठोर मेहनतीनंतर जयगणेश बनले IAS अधिकारी!

विषय : बौद्धिक चाचणी
महत्वाचे घटक :
क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन.

विषय : मराठी व्याकरण
महत्वाचे घटक :
मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

विषय : सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
महत्वाचे घटक :
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अभिमानास्पद बाब; सफाई कामगाराचा मुलगा झाला अधिकारी

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी अडचणींवर मात करत अभ्यास करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तसेच प्रशांत …

अल्पभूधारक शेतकऱ्याची लेकाने पटकावला UPSC परीक्षेत ३९५वा रॅंक….

UPSC Success Story आर्थिक परिस्थिती बेताची….साडेचार एकर जमीन… सोयाबीन, कापूस, तूर हंगामी पिके… संपूर्ण कुटुंब …