पोट, मांडी, कंबरेची चरबी मेणासारखी वितळेल, खा हे 7 नॅच्युरल फॅट बर्नर पदार्थ, पोटात जाताच एक्स्ट्रा फॅट जाळतात

Fat Burner Foods : तुमचे वजन खूप जास्त आहे का? पण तुम्हाला वजन कमी करण्यासाठी प्रेरणा मिळत नाहीये का? Weight Loss करायचं म्हटलं की आळस येतो का? जिमला जायला कंटाळा येतो का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे होय असतील तर बॉस हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण तुम्ही जर योग्य डाएट फॉलो केले तरी काही प्रमाणात वजन कमी करू शकता. हो, तुम्हाला जिममध्ये जाऊन मेहनत करण्याची देखील गरज नाही. असे काही पदार्थ आहेत हे Natural Fat Burner म्हणून ओळखले जातात. म्हणजेच हे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरावर वाढलेली एक्स्ट्रा चरबी हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदार्थांचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर दिसून येत नाहीत. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर, न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, जर मर्यादित प्रमाणात या पदार्थांचे सेवन केले तर वजन कमीच होत नाही तर अनेक आरोग्याच्या समस्यांना धोका सुद्धा कमी होतो. हे पदार्थ शरीरातील चयापचय क्रिया अर्थात Metabolism वाढवते आणि फॅट सेल्स कापण्याचे काम करते. जर तुम्ही सर्व प्रकारचे वेटलॉस उपाय करून कंटाळला असाल तर एकदा हा उपाय नक्की करून बघा. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!

दालचिनी

दालचिनी

आपल्या रोजच्या आहारातील हा मसाला ग्लुकोजला अत्यंत जलद गतीने पेशींमध्ये घेऊन जाण्यास मदत करतो. ज्यामुळे फॅट स्टोरेज हार्मोन इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. दालचिनी हे रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचे काम करते. म्हणूनच तुमच्या आहारात दालचिनीचा समावेश असायला हवा. आपण ताटात असलेली दालचिनी अलगद बाहेर करतो. पण असे करून आपण आपल्याच आरोग्याचे नुकसान करत असतो.

(वाचा :- सावधान, फळांसोबत चुकूनही खाऊ नका हे 7 पदार्थ, पोटात बनते अ‍ॅसिडची भयंकर विषारी ज्वाला,किडनी होते कायमची निकामी)​

हळद

हळद

हळदीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हळद हा जुन्या दुर्धर आजारांवर रामबाण उपाय आहे. हळद ही फॅट सेल्स बर्न करण्यासाठी खूप जास्त उपयोगी समजली जाते. अनेक संशोधनामधूनही ही गोष्ट समोर आली आहे. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल असे अनेक गुणधर्म असतात, जे अनेक आजारांपासून संरक्षण करतात. म्हणूनच आहारामध्ये हळदीचा समावेश असायलाच हवा. हळद विरहित अन्न खाल्ल्याने आपण अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून मुकतो.
(वाचा :- TB Cough Symptoms : ज्याला तुम्ही सामान्य खोकला समजता आहात तो TB तर नाही ना? या लक्षणांवरून झटक्यात) ओळखा फरक.!​

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रस

ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार, 20 दिवस दररोज 11 ग्रॅम टोमॅटोचा रस सेवन केल्याने जास्त वजन असलेल्या महिलांच्या शरीरावरचे फॅट कमी झाल्याचे आढळून आले. तसेच शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करणारे ‘ऍडिपोनेक्टिन’ नावाच्या प्रोटीनची पातळी वाढल्याचे देखील दिसून आले. त्यामुळेच हा एक जबरदस्त वेटलॉस आणि फॅट बर्नर उपाय म्हणून पुढे येत आहे. जगभरात याच कारणामुळे टोमॅटो ज्यूसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
(वाचा :- Foods For Cholesterol: घाणेरडं विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात शरीराबाहेर फेकलं जातं, हे 11 पदार्थ करतात रक्त शुद्ध)​

हेही वाचा :  जिममध्ये कितीही घाम गाळा, हे ५ पदार्थ हद्दपार कराल तर तर वजनाचा काटा सरकेल

चिंच

चिंच

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, चिंच शरीरातील सेरोटोनिनची पातळी नियंत्रित करून तुमची भूक आणि शरीरातील चरबी दोन्ही कमी करू शकते. अनेक जाणकार देखील या गोष्टीला दुजोरा देतात. वेटलॉसच्या अनेक प्रोडक्टसमध्ये सुद्धा चिंचचा समावेश केल्याचे याच कारणामुळे आढळून येते. त्यामुळे तुम्ही देखील रोज नाही पण कधी कधी चिंचेच्या पदार्थांचे सेवन केल्यास हरकत नाही.
(वाचा :- जास्त स्ट्रेसमुळे मेंदूला जडतो हा गंभीर आजार, Board Exam 2023 च्या आधीच करा डॉक्टरांनी सांगितलेली ही 5 कामे..!)​

केल

केल

केल ही एक युनिक भाजी आहे ज्याबद्दल अनेक लोकांना आजही माहीत नाही. पण ही भाजी आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे. दोन कप केलमध्ये 10 ग्रॅम फायबर असते जे तुमचे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील फॅट पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे असते. याव्यतिरिक्त, सब्जाच्या बिया किंवा चिया सिड्स आणि अव्हाकॅडो देखील फॅट बर्नर म्हणून ओळखले जातात. त्यांचे सेवन तुम्ही करू शकता.
(वाचा :- Joint Muscle Oil : गुडघेदुखी व हाडांतील वेदना 1 रात्रीत होतील गायब, लावा आयुर्वेदिक डॉक्टरांची ही 6 घरगुती तेल)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

हेही वाचा :  जळेल पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, झपाट्याने होते वेटलॉस, खा हा एक पदार्थ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …