पोहरा देवीचा नवस फेडायला जाताना काळाचा घाला; अ‍ॅपे रिक्षा उलटली, 5 भाविक जागीच ठार

Yavatmal Accident News: यवतमाळमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुसद दिग्रस मार्गावर असलेल्या बेलगव्हान घाटात अॅपे वाहनाला अपघात झाला आहे. अॅपे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. (Accident News In Marathi)

यवतमाळच्या बेलगव्हान घाटात हा भीषण अपघात झाला आहे.  सर्व प्रवासी हे मोहा तांडा, टोकी तांडा, पांढुरणा, सिंघनवाडी येथील रहिवासी आहेत. पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी आयोजित केलेल्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अॅपे उलटला. या अपघात इतकी भीषण होता की वाहन उलटल्यानंतर त्यातील 5 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर, 11 प्रवासी जखमी झाले आहेत. 

अपघाताची माहिती समजताच जखमी प्रवाशांना पुसदच्या मेडिकेअर रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले होते. काही प्रवासी हे किरकोळ जखमी आहेत. तर काहींना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी आमदार इंद्रनील नाईक व आमदार निलय नाईक यांनी भेट देऊन त्याची विचारपूस केल्याची माहितीही समोर येते आहे. 

हेही वाचा :  Maha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !

दरम्यान, गावाकडील भागात सार्वजनिक वाहनांची कमतरता असल्याने वाहतुकीसाठी खासगी अॅपेचा वापर केला जातो. मात्र, कधीकधी यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने वाहनांवर लोड येतो. अशावेळी हे अपघात घडले जातात. अनेकदा अशा प्रकरणांत आरटीओ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जाते. 

परळ हिंदमाता ब्रिजवर भीषण अपघात

मुंबईतील परळ येथील हिंदमाता ब्रिजवर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला आदळल्याने हा अपघात घडला आहे. ट्रिपल सीट बाईक चालवणं महागाच पडला आहे. या अपघातात दोन तरुणीसह एका मुलाने जीव गमावला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांकडून अधिक कारवाई करण्यात येत आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …