PM Modi Chest Thumping: राज्यसभेत सर्व खासदारांसमोर छाती ठोकत मोदी म्हणाले, “संपूर्ण देश पाहतोय की…”

PM Modi chest thumping says nation is watching one is enough for opposition: राज्यसभेमध्ये (Rajyasabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज भाषण दिलं. मोदींनी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेमध्येही विरोधकांवर आणि खास करुन काँग्रेसवर निशाणा साधला. मोदींनी 85 मिनिटं भाषण केलं. यामध्ये मोदींनी नेहरु, गांधी कुटुंबाबरोबरच कलम-370, नोकऱ्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं.

कर्ज घेऊन काय हाल झाले

मोदींनी आपलं भाषण संपवताना ज्यांना सत्तेशिवाय इतर काही दिसत नाही त्यांनी अर्थनीती अनर्थ नीतिमध्ये बदलली, असा टोला लगावला. विरोधकांना आव्हान देताना, “मी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो, सभागृहातील गांभीर्य लक्षात घेऊन सांगतो की आपआपल्या राज्यांमध्ये जाऊन समजून सांगा. तुम्ही चुकीच्या रस्त्यावर जात आहात असं म्हणत असाल तर शेजारच्या देशांमधील परिस्थिती पाहताय ना, नको तशी कर्ज घेऊन काय हाल झाले आहेत,” असं मोदी म्हणाले.

मुलांचे हक्क हिरावून घेऊ नका

पंतप्रधान मोदींनी टीका करताना विरोधकांना वाटतंय की आपण कर्ज घ्यावं आणि ते पुढली पिढी फेडेल. कर्ज घ्या आणि तूप प्या अशी भूमिका राज्यांना आर्थिक संकटात टाकेल आणि देशालाही, असा इशारा मोदींनी दिला. शेजारचे देश पाहत आहात ना. जगात कोणीच त्यांना कर्ज देण्यास तयार नाही. राजकीय पक्ष म्हणून भूमिका घेताना देशाच्या आर्थिक स्थितीबरोबर खेळू नका. तुम्ही असं कोणतीही पाप करु नका जे तुमच्या मुलांचे हक्क हिरवून घेईल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

हेही वाचा :  जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय

मोदी छाती ठोकून म्हणाले

मोदींचं भाषण सुरु असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘अदानी अदानी’, ‘मोदी-अदानी’, ‘मोदी- अदानी भाई भाई’ची घोषणाबाजी सुरु ठेवली. ही घोषणाबाजी सुरु असतानाच मोदींनी आम्ही सामाजिक न्याय, दोनवेळेचं जेवण यासारख्या समस्यांवर उत्तरं शोधली आहेत. तुम्हाला हे जमलं नाही, असा टोला विरोधकांना लगावला. आम्ही स्वतंत्र भारताची स्वप्न आणि संकल्प पूर्ण करण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहोत. विरोधक खासदारांकडे पाहून मोदींनी छाती ठोकत, “सभापतिजी, संपूर्ण देश पाहत आहे की एकटी व्यक्ती किती लोकांवर भारी पडत आहे, एकजण किती जणांवर भारी पडतोय हे दिसतंय. नारे देण्यासाठीही यांना खासदार बदलावे लागतात. दोन मिनिटं हा बोलतो दोन मिनिटं तो. इथं एक तास झाला तरी आवाज कमी झालेला नाही,” असं म्हटलं.

मी जगतो देशासाठी

मी देशासाठी जगतो आणि देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने झटत आहे. राजकीय खेळ खेळणाऱ्यांमध्ये हा विश्वास नाही. त्यामुळेच ते स्वत:ला वाचवण्याचे रस्ते शोधत आहेत, असा टोलाही मोदींनी लगावला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …