जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय

Pune Yerwada Central Jail : आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना अॅल्युमिनिअमच्या थाळीत पाणीदार डाळ आणि भात खाताना पाहिलं असेल.मात्र आता कैद्यांना चक्क आइस्क्रिम,पाणीपुरीची चंगळ असणार आहे. जेलमधील कैद्यांना  पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला मिळणार आहे. अर्थात यासाठी कैद्यांना पैसै मोजावे लागतील. 

तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर पडली आहे. यात चाट मसाला, लोणचं, ताजं पाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, शुगर फ्री स्वीटनर, आईस्क्रीम, सेंद्रिय फळं, पीनट बटर, पाणीपुरी, आर्ट बुक्स, कलरिंग मटेरियल या वस्तूंची यादी करण्यात आली आहे. 

याशिवाय, फेस वॉश, केसांचा रंग इत्यादी वैयक्तिक काळजीच्या वस्तूंचाही समावेश आहे. धूम्रपान करण्याची इच्छा कमी करण्यासाठी निकोटीन-आधारित गोळ्यांना देखील परवानगी आहे. हा निर्णय कैद्यांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे. कैद्यांना विविध अन्न पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी दिलीये.त्यामुळे आता कारागृहातील कैद्यांनाही आईस्क्रिम,पाणीपुरीवर ताव मारता येणार आहे.

कारागृहातील कैद्यांना कारागृहातून आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची सुविधा

लवकरच कारागृहातील कैद्यांना कारागृहातून आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सरकारकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये कैद्यांना कुटुंबीयांशी बोलण्यासाठी टेलिफोनिक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक कैद्याला त्याच्या कुटुंबीयांशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटापर्यंत बोलू दिलं जाणार आहे.. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट कार्ड देऊन नातेवाईक किंवा वकिलाशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटे बोलण्याची मुभा देण्यात आली होती, त्याचा चांगला फायदा दिसून आला. आता कैद्यांना टेलिफोनिक सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.. 

हेही वाचा :  Rose Day 2023 : वेट लॉस, एनर्जी बुस्टर, स्किन ग्लो गुलाबाचे ८ जबरदस्त आरोग्यदायी फायदे

जेलमध्ये शिक्षा भोगत असताना ललित पाटील हॉटेलवर दर महिन्याला 17 लाख उडवले

जेलमध्ये शिक्षा भोगत असताना ललित पाटील हॉटेलवर दर महिन्याला 17 लाख उडवत होता. विशेष म्हणजे ललित पाटीलची ही बडदास्त पोलिसांच्या सहकार्याने ठेवली जात होती. ससून हॉस्पिटलच्या शेजारच्या लेमन ट्री हॉटेलमध्ये ललित पाटीलची रूम सातत्याने बुक केली जात असे. त्याच्या मैत्रिणीसोबत ललित पाटील या हॉटेलमध्ये ऐश सुरु होती. ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांचाच ललितच्या हॉटेलमध्ये सर्व लीलांना आशीर्वाद असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले होते.

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …