सध्या सोशल मीडियावर फिरत असलेला कलाकाराचा लहानपणीचा फोटो नक्की कोणाचा आहे?. समोर आलेल्या फोटोमध्ये शाहरुख खान आणि त्याच्या सोबत एक लहान मुलगा दिसत आहे. या फोटोमध्ये फॅन म्हणून हसत हसत फोटो काढलेलं मूल आज बी-टाऊनमधील प्रसिद्ध नाव आहे. पांढऱ्या टी-शर्टमध्ये फोटो काढलेल्य मुलाचा चेहरा पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की शाहरुख खानला भेटून त्याला किती आनंद झाला आहे. त्या मुलाच्या वडिलांनी हा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा – ‘सस्ती कंगना’; ‘त्या’ गोष्टीवरुन अंकिता लोखंडे होतेय ट्रोल, पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय VIRAL VIDEO
शाहरुख खानसोबत दिसत असलेला हा लहानगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विकी कौशल आहे. हा फोटो तेव्हाचा आहे तेव्हाचा आहे जेव्हा शाहरुख ‘अशोका’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. हा फोटो स्टंट दिग्दर्शक आणि विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांनी शेअर केला आहे. एकेकाळी चाहत्यासारखा फोटो काढणारा हा मुलगा एक दिवस मोठा कलाकार होईल आणि लोक त्याच्यासोबत फोटो काढायला एवढे उत्सुक असतील असं कोणालाही वाटलं नव्हतं.
दरम्यान, विकीचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. विकीनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं असून आज त्याची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी केली जाते. विकीनं आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या