Petrol-Diesel Price : ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेस स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price on 19 March : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. परिणामी आज भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Rate) दर दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या जारी करतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित केले जातात. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बँकांच्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली जात आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Rate)  किमतींतवर दिसून येतो.

आज, WTI क्रूड ऑइलमध्ये 2.36 टक्क्यांची घसरण झाली असून प्रति बॅरल $ 66.74 वर पोहोचले आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत देखील 2.32 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे आणि ते प्रति बॅरल $ 72.97 वर व्यवहार करत आहे. या घसरणीनंतरही रविवारी (19 March 2023) देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

वाचा : आज लोकलने प्रवास करताय? मग मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या… 

हेही वाचा :  'राम मांसाहार करायचा'वर पवार स्पष्टच बोलले, 'ते विधान करायची गरज नव्हती मात्र आव्हाडांनी...'

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीला लागून असलेल्या एनसीआर भागात आज अनेक ठिकाणी इंधन दरात बदल होताना दिसला आहे. नोएडामध्ये आज पेट्रोल 41 पैशांनी आणि डिझेल 38 पैशांनी महागले असून पेट्रोल 97.00 रुपये तर डिझेल 90.14 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. दुसरीकडे, हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पेट्रोल 34 पैसे, डिझेल 33 पैशांनी महागले असून पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लीटरने विकले जाते.  उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये पेट्रोल 92 पैसे आणि डिझेल 67 पैसे स्वस्त दराने 95.21 रुपये आणि 90.29 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोल 10 पैसे आणि डिझेल 10 पैशांनी महागले आहे. आज रांचीमध्ये पेट्रोल 17 पैसे आणि डिझेल 17 पैशांनी महागले आहे. आज जयपूरमध्ये पेट्रोल 8 पैसे स्वस्त आणि डिझेल 8 पैसे 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर

  • दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
हेही वाचा :  पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचा भाव

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …