मोत्यांनी जडलेल्या नेट साडीत सोनम कपूरचा रॉयल महाराणी लुक, फिट अँड फाईन फिगर बघून म्हणणारच नाही एका मुलाची आई

बॉलीवूड अभिनेत्री Sonam Kapoor सध्या आई झाल्याची सुंदर अनुभूती घेत आहे. कोणत्याही स्त्रीसाठी आई होण्याचा आनंद हा सगळ्यात मोठा असतो आणि सोनम सुद्धा त्याला अपवाद नाही. भले ती एवढी श्रीमंत असेल, तिच्या हाताखाली नोकर चाकर असतील पण तरी एक आई म्हणून ती आपल्या बाळासाठी खरंच वेगळ्या भूमिकेत आहे. पण आई झाली असली तरी सोनम कपूर आपला फॅशन आणि स्टाईल सेन्स काही विसरलेली नाही आणि म्हणूनच बी टाऊनमध्ये आजही या स्टायलिश मॉमच्या चर्चा होत आहेत.

नुकताच सोनमचा एक फोटो समोर आला ज्यात ती तिच्या नवीन लुकसह फॅशन गोल देताना दिसली. आई झाल्यानंतरही तिच्या स्टाइलिंग सेन्समध्ये फारसा बदल झालेला नाही. तिने स्वतःला पूर्वीप्रमाणेच स्टाईल करते आहे, ज्यामध्ये तिचा लूक पाहण्यासारखा आहे. पारंपारिक कपड्यांतील या अभिनेत्रीने आपल्या जबरदस्त लुक्सने पुन्हा एकदा आपली ओळख ठळक केली आहे. शिवाय प्रेग्नेंसीनंतरही तिने मेंटेंन ठेवलेला फिटनेस आणि स्लिम-ट्रिम फिगर वाखाणण्याजोगं आहे. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम @sonamkapoor)

हेही वाचा :  Summer Beauty Tips : उन्हाळ्यात वाढणारी पिंपल्स, डार्क सर्कल्स व ऑइली स्किनची समस्या होईल चुटकीसरशी दूर, करा ‘ही’ 5 कामे!

या डिजाईनरची साडी केली परिधान

या डिजाईनरची साडी केली परिधान

सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर खूप सुंदर फोटो शेअर केले होते, ज्यातून तुम्ही सुद्धा लग्नाच्या फंक्शन्ससाठी काही टिप्स घेऊ शकता. तिने ही पांढऱ्या रंगाची साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधून निवडली होती, जी सिल्क आणि नेटसारखे फॅब्रिक वापरून बनवली होती. एकंदर ही साडीच एवढी सुंदर होती की त्यावरून अजिबात नजर हटत नव्हती.

(वाचा :- बिर्ला ग्रुपच्या मालकाची लेक Ananya Birla जणू स्वर्गातील अप्सराच.! अदा व रूप बघून विसराल अंबानींच्या सुना-लेकी)​

इंट्रिकेट एम्ब्रॉईडरीने सजलेल्या साडीत सोनमची सुंदरता

इंट्रिकेट एम्ब्रॉईडरीने सजलेल्या साडीत सोनमची सुंदरता

या साडीत सोनम क्वीनपेक्षा कमी दिसत होती. तिच्या या पांढऱ्या नेटच्या साडीवर क्रिस्टल आणि मोती लावण्यात आले होते. जे पांढऱ्या रंगाच्या बारीक रेशीम धाग्यांच्या मदतीने जोडले गेले. त्याचवेळी, फ्लोरल पॅटर्नमध्ये काठावर एक मॅचिंग एम्ब्रॉयडरीची पट्टी दिसत होती आणि काठावर पांढऱ्या रंगाची झालर सुद्धा जोडली गेली होती. जणू ही साडी सोनमसाठीच बनवली गेली आहे की काय असे वाटत होते इतकी या साडीत सोनम सुंदर दिसत होती.

(वाचा :- हि-यांनी जडलेला लाखो रूपयांचा नेत्रदिपक बॉडीकॉन ड्रेस, दिशा पाटणीचा इंटरनेटवर आग लावणारा ब्लास्ट लुक आला समोर)​

हेही वाचा :  according to chanakya niti these mistakes can ruin your married life

सुंदर विणकाम केलेला दुपट्टा

सुंदर विणकाम केलेला दुपट्टा

सोनमने या साडीसोबत डीप व्ही नेकलाइन क्रॉप ब्लाऊज घातला होता, ज्यामुळे तिला मोनोक्रोम लुक मिळाला होता आणि तिचा संपूर्ण ट्रेडीशनल अवतार अतिशय रॉयल दिसत होता. या लूकमध्ये स्टाईल वाढवण्यासाठी सोनम कपूरने पांढरा दुपट्टा कॅरी केला होता, ज्यावर व्हाईट सिल्क थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सिक्विन वर्क दिसत होते.

(वाचा :- पद्मश्री सन्मान मिळताच रविना टंडन नखशिखांत सजून पडली घराबाहेर, क्रॉप चोळी व ब्राऊन लेहंग्यात केला कलेजा खल्लास)​

रॉयल ज्वेलरी केली कॅरी

रॉयल ज्वेलरी केली कॅरी

सोनमने तिची भारी डिझायनर साडी पर्ल चोकर नेकपीस, व्हाईट स्टड ईअरिंग्ज, लाल ब्रेसलेट आणि डायमंड रिंगसह पेअर केली होती. मेकअपसाठी हेवी फाउंडेशन, पिंक आयशॅडो, विंग्ड आयलायनर, मस्करा, कॉन्टोर चीक्स, पेस्टल पिंक लिप शेड वापरत तिने आपले केस मोकळे सोडले होते. सोनमने एक विशेष ऍक्सेसरी देखील जोडली होती आणि ती होती तिचे एका लक्झरी ब्रँडचे रॉयल वॉच, जे दुरूनच पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेण्याचे काम करत होते.

(वाचा :- अक्षर पटेलची पडली विकेट, क्रिकेटर्सनी लावला लग्नाचा धडाका,सफेद मोत्यांत विणलेला नवरीबाईचा लेहंगा घालतोय मोहिनी)​

हेही वाचा :  बळीराजा सुखावणार! राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

​सोनमकडून घेऊ शकता टिप्स

​सोनमकडून घेऊ शकता टिप्स

सोनम ही त्या अभिनेत्रींपैकी आहे ज्यांना फॅशन आणि स्टाईलचा जबरदस्त सेन्स आहे, शिवाय ती लेटेस्ट ट्रेंड्स देखील सतत फॉलो करत असते. त्यामुळे तुम्हाला जर स्वत:मध्ये फॅशन आणि स्टाईलबाबत मोठा बदल घडवायचा असेल तसेच अपटूडेट राहायचे असेल तर नक्कीच तुम्ही सोनम कपूरला फॉलो करून तिच्याकडून टिप्स घेऊ शकता. तिच्या टिप्स नक्कीच तुमच्या कामी येतीलं आणि ज्या पद्धतीने तिच्याकडे सगळे जण वळून वळून पाहतात तसेच तुमच्याकडे देखील नक्कीच पाहतील.

(वाचा :- गडगंज श्रीमंत असूनही नीता अंबानीने मुलाच्या साखरपुड्यात केली ही अनपेक्षित गोष्ट, ज्याचा वाटला पूर्ण जगाला हेवा)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …