Pathan : शाहरुख खानच्या ‘पठाण’ची क्रेझ संपेना!

Shah Rukh Khan Pathan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे बॉलिवूडचा बादशाह आता खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरचा बादशाह झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 21 रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 

‘पठाण’च्या 21 रेकॉर्ड्सबद्दल जाणून घ्या… (21 New Records Created By Pathan) 

  •  ‘पठाण’ हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 
  • ‘पठाण’ या सिनेमाच्या हिंदी वर्जनने रिलीजच्या पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई केली आहे. 
  • ‘पठाण’च्या हिंदी वर्जनने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 70 कोटींचा गल्ला जमवला आहे. 
  • 100 कोटींचा टप्पा जलदगतीने पार करणारा हिंदी सिनेमा ‘पठाण’ ठरला आहे. 
  • सलग दोन दिवस 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा सिनेमा ‘पठाण’ ठरला आहे. 
  • रिलीजच्या पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी ‘पठाण’ने सर्वाधिक कमाई केली आहे. 
  • भारतात ‘पठाण’च्या हिंदी वर्जनचे सर्वाधिक शो आयोजित करण्यात आले होते. 
  • सुट्टीचा दिवस नसतानाही ‘पठाण’ सिनेमाने ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई केली आहे.
  •  ‘पठाण’ हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 
  • 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या निर्मितीसंस्थेत ‘यशराज फिल्म स्टुडिओ’ची गणना होते. 
  • ‘पठाण’सह यशराजच्या आणखी चार सिनेमांनी 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 
  • ‘पठाण’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘वार’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 
  • शाहरुखचा ‘पठाण’ स्पाय युनिव्हर्स सिनेमा ठरला आहे. 
  • शाहरुखच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी ‘पठाण’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी आपली जादू दाखवली आहे. 
  • रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दीपिकाचा ‘पठाण’ हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. 
  • ‘पठाण’ हा सिनेमा जॉन अब्राहमच्या आतापर्यंतच्या सिनेमांतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 
  • सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे. 
  • यशराज फिल्म्सच्या ‘पठाण’ने रिलीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
  • ‘पठाण’ या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच सर्वाधिक कमाई केली होती. 
  • शाहरुखच्या ‘पठाण’ने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. 
हेही वाचा :  'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर

‘पठाण’ची रेकॉर्डब्रेक कमाई!

‘पठाण’ या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 24 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. 250 कोटींच्या बजेट मध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 55 कोटी तर दुसऱ्या दिवशी 65 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 120 कोटींचा गल्ला जमवला आहे. दिवसेंदिवस अनेक रेकॉर्ड हा सिनेमा आपल्या नावे करत आहे. 

संबंधित बातम्या

Pathan Box Office Collection Day 2: केजीएफ 2 अन् बाहुबली 2 लाही टाकलं मागे; दुसऱ्या दिवशी पठाणची छप्पर फाड कमाई

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …