भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यासाठी मैदानात, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ 1st T20 LIVE :  भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आजपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यावर आता टी20 मालिका सर करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. आज होणारा पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (JSCA International Stadium) खेळवला जात आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेणार असल्याने आजचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे.  

या सामन्यात भारत ईशान किशन आणि शुभमन गिल यांना सलामीची संधी देऊ शकतो. शुभमनने अलीकडच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर ईशाननेही स्वत:ला सिद्ध केलं आहे. टीम इंडियात राहुल त्रिपाठीला नंबर 3 साठी संधी दिली जाऊ शकते. तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसंच युवा खेळाडू जितेश शर्माला विकेटकीपिंगची संधी मिळू शकते. दरम्यान, या सर्वांत पृथ्वी शॉला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं कठीण आहे. तसंच रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे भारतातील इतर मैदानांपेक्षा थोडं वेगळं आहे. इतर मैदानांच्या तुलनेत हे एक मोठं मैदान आहे. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदेशीर नाही. याठिकाणी फिरकीपटूंना अधिक फायदा मिळत असल्याचं दिसून आलं आहे.पण खेळपट्टीची एकूण परिस्थिती पाहता फलंदाजांना अधिक फायदा होतो. विशेष म्हणजे या मैदानावर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 160 च्या मध्यभागी आहे. त्यात  भारतातील अलीकडच्या काळातील सामने पाहता आज संघांनी 200 च्या वर धावा केल्या तर आश्चर्य वाटणार नाही. दव हा देखील एक महत्त्वाचा घटक आज राहणार आहे. आणि पाठलाग करणाऱ्या संघांला अधिक फायदा मिळू शकणार असल्याने गोलंदाजी घेणं नाणेफेक जिंकणारा संघ पसंद करेल अशी शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक आज महत्त्वाची ठरु शकते

हेही वाचा :  'मी कायम तुमचा ऋणी राहिन', पंतनं अपघातानंतर मदत करणाऱ्या मुलांचे  मानले आभार

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा टी20 संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …