Parenting Tips: लहान वयातच मुलांना द्या शिकवण, शिवाजी महाराज जयंतीची माहिती द्यावी अशी

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारल्यावरच अंगात उत्साह संचारतो. महाराष्ट्राची आन, बान आणि शान असणारे महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. येणाऱ्या पिढीला लहानपणापासूनच शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्यांच्याबद्दल योग्य माहिती देण्याची गरज आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना महाराजांबाबत कोणत्या गोष्टी सांगाव्यात याची माहिती एक पालक म्हणून तुम्ही नक्कीच जाणून घ्यायला हवी. सोप्या शब्दात शिवाजी महाराजांची शिकवण आणि गर्व गोष्टी स्वरूपात मुलांना कसा सांगावा घ्या जाणून. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​मुलांना सांगावे कोण होते शिवाजी महाराज​

​मुलांना सांगावे कोण होते शिवाजी महाराज​

शिवाजी शहाजी भोसले अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. मराठा साम्राज्याचे संस्थापक ज्यांनी आपले साम्राज्य महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतात पसरवले. जुन्नरजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. स्थानिक देवता शिवाईच्या नावावरून वडील शहाजी आणि आई जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी ठेवले. मुघल सत्तेला न जुमानता मराठा साम्राज्य निर्माण करणारा असा नेता कधीच झाला नाही. मुलांना हे गोष्टी स्वरूपात सांगितल्यास त्यांच्यामध्ये अधिक उत्सुकता निर्माण होते.

हेही वाचा :  मराठ्यांचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांच्या कार्याची मनोरंजनसृष्टीने घेतली दखल

​साम्राज्याचे संरक्षण करण्यासाठी नौदलाचा केला वापर​

​साम्राज्याचे संरक्षण करण्यासाठी नौदलाचा केला वापर​

मराठा साम्राज्य वाढविण्यासाठी आणि मुघलांपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी अत्यंत लहान वयापासूनच महाराजांनी सत्ता हातात घेऊन नौदलाचा योग्य वापर केला. अनेक ठिकाणी गड आणि किल्ले सर करत संपूर्ण महाराष्ट्र महाराजांनी लहान वयातच ताब्यात घेतला होता. रयतेचा राजा म्हणून आपली एक ओळख निर्माण केली. महाराजांच्या नेतेपणामुळे जनता त्यांच्यासाठी आपला प्राण देण्यासही तयार होती. यामुळे नौदलाची ओळख निर्माण होते आणि त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुलांच्या मनात प्रश्नही निर्माण होतात. तसंच महाराजांच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.

(वाचा – जुळ्या बाळांपैकी गर्भातच एक होऊ शकते गायब, तुम्हाला हा आजार तर नाही?)​

​अनेक परकीय सत्ता धुडकावून लावल्या​

​अनेक परकीय सत्ता धुडकावून लावल्या​

लहान मुलांना हिरो ही संकल्पना अत्यंत जिव्हाळ्याची वाटते. तर केवळ महाराष्ट्राच्या जनतेसाठीच शिवाजी महाराज हे हिरो ठरले नाहीत हे त्यांच्या मनावर तुम्ही गोष्टी स्वरूपात बिंबवू शकता. परकीय सत्ता धुडकावून लावण्यासाठी महाराजांनी केलेला गनिमी कावा, युद्ध या गोष्टी मनोरंजक स्वरूपात त्यांना आयुष्यात पुढे काय करता येऊ शकते यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात.

(वाचा – वॉटर बर्थ थेरपी म्हणजे नेमके काय? कसा होतो बाळाचा जन्म आणि गर्भवतीच्या यातना होतात कमी)

हेही वाचा :  ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळलीयत- राज ठाकरे

​उत्तम प्रशासक आणि सक्षम राजा​

​उत्तम प्रशासक आणि सक्षम राजा​

राज्याची घडी कशी प्रशासकीयदृष्टाय नीट राहील याची वेळोवेळी महाराजांनी काळजी घेतली. इतक्या मोठ्या साम्राज्यातील जनतेला जास्तीत जास्त सुखसोयी, अन्नपुरवठा होणे आणि कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेत राज्याच्या उत्तम व्यवस्था जपली आणि एक सक्षम राजा कसा असायला हवा याचे उदाहरण घालून दिले. आजही इतक्या वर्षांनंतर छत्रपती राजांचेच नाव घेतले जाते.

(वाचा -Parenting Tips: मुलांच्या वडिलांकडून होतात बरेचदा या चुका, बाँड जपण्यासाठी वेळीच सुधारा)

​मुलांना शिवाजी महाराजांची ही माहिती असायलाच हवी​

​मुलांना शिवाजी महाराजांची ही माहिती असायलाच हवी​
  • १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. त्यांना त्यांच्या शब्दात Birthday म्हणून समजावले तरीही जयंती म्हणजे नेमकं काय हेदेखील स्पष्ट करावे
  • शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे राज्यकर्ता होते हे समजवावे आजही शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यावेळी शिवाजी महाराजांचे आदर्श आणि शिकवण याबाबत माहिती देण्याची आवश्यकता आहे

​महाराजांच्या लहानपणीच्या गोष्टींबाबत द्यावी माहिती​

​महाराजांच्या लहानपणीच्या गोष्टींबाबत द्यावी माहिती​
  • लहानपणी शिवाजी महाराज दांडपट्टा खेळायचे. या लोप पावत असलेल्या खेळाची माहिती मुलांना द्यावी
  • घोडेस्वारी आणि धनुर्विद्या म्हणजे नेमके काय याचीही ओळख मुलांना करून द्यावी
  • रामायण आणि महाभारतातील प्रसंगाच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी त्यांना पुढील आयुष्याच्या लढ्यासाठी तयार केले होते. या गोष्टीही तुम्हीही मुलांना सांगाव्यात अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूशी बुद्धी वापरून कसा लढा द्यायचा यातून काय शिकवण मिळते याची योग्य माहिती मुलांच्या मनावर बिंबवावी
हेही वाचा :  "समृद्धी महामार्ग ‘देवेंद्रभरोसे’, माणसे मेली की शिंदे फक्त..."; 'बाळासाहेबांचा आत्मा अश्रूंनी भिजला' म्हणत हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाचे आदर्श आजही आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीला याची योग्य माहिती देण्याचे काम हे पालकांचेच आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने नक्कीच तुम्ही एक पाऊल उचलू शकता.
अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक कराmaharashtratimes.com​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …