नोकरभरतीतील घोटाळ्यांची मालिका सुरुच, बोगस तलवारबाजांचा नोकऱ्यांवर डल्ला

नोकरभरतीतील घोटाळ्यांची मालिका सुरुच, बोगस तलवारबाजांचा नोकऱ्यांवर डल्ला


पुणे  :  राज्यात नोकरभरतीत सुरू झालेली (Job Recruitment Scams) घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाहीये. आता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे 14 जणांनी सरकारी नोकरी मिळवल्याचं पुढे आलंय. तलवारीबाजी संघटनेच्या बोगस प्राविण्य प्रमाणपत्राचा आधार घेत MPSCची दिशाभूल करत या अधिकाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या लाटल्यायेत. ( 14 people from maharashtra got government jobs by submitting fake sports certificates)

शिक्षक भरती, पोलीस भरतीमध्ये घोटाळ्यांची मालिका सुरूंय. अशातच आता बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी सरकारी नोकऱ्या लाटल्यांचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

तलवारबाजीत चॅम्पियन असल्याचं सांगत 14 जणांनी पोलीस आणि कर विभागात नोकरी मिळवली. यातील 7 जण फौजदार पदावर आहेत तर 7 जण करनिरीक्षक आहेत. 

याबाबत क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना अहवाल पाठवलाय. तलवारबाजी संघटनेचे महासचिव अशोक दुधारेंनी या सर्वांची प्रमाणपत्र सत्य असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचं या अहवालात म्हटलंय.

राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय.

तर दुसरीकडे अशोक दुधारेंनी मात्र आपल्या सहीचा दुरूपयोग झाल्याचं सांगत बोगस प्रमाणपत्रात आपला कोणताही सहभाग नसल्याचं म्हंटलंय.

हेही वाचा :  पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

याआधीही राज्यात ट्रंपोलिन खेळाचे तब्बल 281 बोगस खेळाडू सापडले होते. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर राज्यात अस्तित्वात नसलेल्या आईस हॉकीचेही दीडशे खेळाडू आढळले होते. या प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच आता तलवारबाजीचे बोगस खेळाडूही सरकारी पदांवर असल्याचं समोर आलंय. 

हे 14 सरकारी बाबू कोण? त्यांना ही बोगस प्रमाणपत्रं कुणी दिली? यामागे कुणा-कुणाचा हात आहे? असे अनेक सवाल उपस्थित होतायेत. झी 24 तास या प्रश्नांचा सातत्यानं पाठपुरावा करतच राहील.



Source link