Kartiki Ekadashi 2022 – आळंदी मध्ये भक्तीचा महापूर, कार्तिकी सोहळा उत्साहात..!

Kartiki Ekadashi 2022 – कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) साठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. याच भावनेन आज आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळ अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. 

 

कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्यातील आळंदीच्या इंद्रायणी नदी मध्ये, सुरक्षा आणि बचाव कार्यासाठी, स्थानिक रेस्क्यू टिम ही तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघाची टीम सह भोर, वेल्हा, मुळशीसह पुण्यातल्या रेस्क्यू टीमचे सदस्य बंदोबस्तात सहभागी झालेत.आपत्ती व्यवस्थापन संघाकडून नदीकिनारी असणाऱ्या भाविकांच्या सुरक्षा बचावाचे काम केलं जातंय, तसेच सुरक्षा बाळगण्यासाठी, नदीच्या पात्रात संरक्षित राहण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन संघ भाविकांना करत आहेत. (Deluge of devotion in Alandi Kartiki ceremony in excitement nz)

 

 

हे ही वाचा – Video : शेतकऱ्याच्या घरात शिरला बिबटा, पळ काढणार इतक्यात…

परंपरे नुसार आज आळंदीत समाधी महापूजा पार पडली. समाधीला अभिषेक घालण्यात आला. या अनुपम सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्यांनी समाधान व्यक्त केलं. कोरोना सारखे आजार पुन्हा येऊ नये अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली. गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने 17 नोव्हेंबर ला कार्तिकी वारी सोहळ्याची सुरुवात झाली. 22 तारखेला माऊलींच्या 726 वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. कोरोना संकट दूर झाल्याने लाखो भाविक आळंदी मध्ये दाखल झालेत. 

हेही वाचा :  Relationship Tips : पार्टनर तुम्हाला 'असा' धोका देतोय? कसे जाणून घ्यायचे...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …