एकापाठोपाठ पाच शतकं, एक द्विशतक; कोहली, रोहित, पृथ्वी शॉसोबतच मोडले दिग्गजांचे विक्रम

Vijay Hazare Trophy Narayan Jagadeesan Record: तामिळनाडूचा (Tamil Nadu) फलंदाज नारायण जगदीशन (Narayan Jagadeesan) याच्या नावावर नवा जागतिक विक्रम. प्रथम श्रेणी एकदिवसीय सामन्यात सलग पाच शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. कुमार संगक्कारा, देवदत्त पडिक्कल आणि अल्विरो पीटरसन यांच्या नावावर असलेला सलग चार शतकांचा विक्रम जगदीशनने मोडला.  

141 चेंडूत 277 धावा काढताना एन. जगदीशनने जागतिक विक्रमासोबतच आणखी काही विक्रम आपल्या नावावर केले. विजय हजारे चषकातला पृथ्वी शॉचा 227 या सर्वोच्च धावांचा विक्रम त्याने मोडला. प्रथमश्रेणी सामन्यात जगातील सर्वोच्च धावसंख्येचा अली ब्राऊनचा विक्रमही त्याने मोडला. तसंच विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो सहावा फलंदाज ठरला. 

तामिळनाडूचा सलामीवीर एन जगदीशननं बंगळुरू येथील एन चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2022-23 सामन्यात इतिहास रचला. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात जगदीशननं 277 धावांची दमदार खेळी केली. जगदीशन गेल्या आयपीएल हंगामापर्यंत चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग होता. परंतु, चेन्नईनं डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिनी आयपीएल ऑक्‍शनपूर्वीच नारायण जगदीशनला रिलीज केलं आहे. 

हेही वाचा :  ऋषभ पंतच्या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर, गाडी डिव्हायडरला धडकली अन् काही क्षणाताच भस्मसात

रोहित शर्माचा मोडला रेकॉर्ड 

Reels

जगदीशनने 196 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना अवघ्या 141 चेंडूत 277 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 25 चौकार आणि 15 षटकारही लगावले. जगदीशनने बी साई सुदर्शनसोबत सामन्यात पहिल्या विकेटसाठी 416 धावांची भागीदारी केली. आज आपल्या दमदार खेळीच्या जोरावर त्यानं रोहित शर्माचा विक्रमही मोडीत काढला. हिटमॅननं लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक 264 धावा केल्या आहेत. आज जगदीशनने 277 धावा करत टीम इंडियाच्या कर्णधारालाही मागे टाकलं आहे. 

बॅक टू बॅक पाच शतकं 

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात एन जगदीशनने बॅक टू बॅक पाच शतकं झळकावली आहेत. याआधी विजय हजारे ट्रॉफीच्या मागील चार सामन्यांमध्ये जगदीशननेही तुफान फटकेबाजी करत शतक झळकावलं होतं. 

दुहेरी शतकाचा विक्रम

याच सामन्यात एन जगदीशनचं त्रिशतक थोडक्यात हुकलं खरं, पण जगदीशनने आपल्या दमदार खेळीनं द्विशतक झळकावलं. हा विक्रम करत जगदीशन एका खास क्लबचा भाग बनला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक झळकावणारा जगदीशन हा सहावा फलंदाज ठरला आहे. 

आयपीएलमध्ये जगदीशनवर सर्वांच्या नजरा 

एन. जगदीशन सीएसकेकडून आयपीएलमध्ये खेळत होता. परंतु आयपीएल 2023 साठी सीएसकेनं प्रसिद्ध केलेल्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजेच, जगदीशन लवकरच आयपीएलच्या मिनी लिलावात दिसणार आहे. आता त्याच्यावर कोणता संघ बोली लावणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

हेही वाचा :  IPL 2022 : उमेश, कुलदीप आणि ललीत चमकले, वीरेंद्र सेहवाग म्हणतो आतापर्यंत यादवांची आयपीएल

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

FIFA World Cup 2022: रोनाल्डो अन् मेस्सी यांच्यात रंगलाय बुद्धिबळाचा डाव; विराट कोहली म्हणतोय, “क्या फोटो है यार”

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …