National Youth Day 2023: राष्ट्रीय युवा महोत्सवात ३० हजार युवक होणार सहभागी

National Youth Day 2023: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात देशभरातील ३० हजारहून अधिक तरुण सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली..

कर्नाटकातील हुबळी येथे १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हा महोत्सव १६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात अनेक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

देशात स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा होत आहे. सशक्‍त होण्‍यासोबतच देशच्‍या विकासात तरुणांची महत्‍त्‍वाची भूमिका असेल. मलखम, योगासन, कलारेपट्टू, थांगटा आणि गटका या भारतातील पाच पारंपारिक खेळांचा या महोत्सवात समावेश करण्यात येणार आहे, जेणेकरून लोकांना त्यांची माहिती व्हावी आणि ते भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ होऊ शकतील अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली.

१९८४ मध्ये राष्ट्रीय युवा दिन जाहीर

भारत सरकारने १९८४ मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर केला. १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारी रोजी देश राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांची भाषणे, त्यांची शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहेत. युवा दिनाची थीम, महत्त्व, भारतातील कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा :  पंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या ‘या’ ७ सवयी विद्यार्थ्यानी अंगीकारा, आयुष्यात व्हाल यशस्वी

राष्ट्रीय युवा दिन २०२३ ची थीम विकसित युवक – विकसित भारत

आपल्या देशाती प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीच्या वैश्विक बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेने देशाच्या सर्व भागातील विविध संस्कृतींना एका समान व्यासपीठावर एकत्र आणले जाते.

Positive Thoughts For 2023: २०२३ मध्ये करिअरच्या सर्वोच्च स्थानी पोहोचाल, ‘हे’ १० मौल्यवान विचार करा आत्मसात
यंदा हा महोत्सव १२ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान कर्नाटकातील हुबळी-धारवाड येथे “विकसित युवक – विकसित भारत” या विषयावर आयोजित करण्यात आला आहे. हा दिवस देशातील तरुणांसाठी साजरा केला जातो आणि त्यांना विवेकानंदांचे विचार आणि तत्त्वज्ञान स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो. हा भारताचा २६ वा राष्ट्रीय युवा महोत्सव असेल.

National Press Day : राष्ट्रीय पत्रकारिता दिवस का साजरा केला जातो?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …