Breaking News
  • 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्यात काय फरक आहे? ते कसे ओळखावे? समजून घ्या! – Lets Talk
  • जमिनीची कागदपत्र हरवल्यावर सर्वात आधी करा ‘हे’ काम अन्यथा बसेल मोठा फटका!
  • गुंतवणुकीसाठी तयार रहा, ही फायनान्स कंपनी आणतेय आपला IPO
  • टीना दाबीची 12वीची मार्कशीट लीक, पाहा तिला किती मार्क्स मिळाले – Taza Hindi Samachar
  • या मोबाइल फोनवर 13,500 रुपयांची सूट मिळवा, आजच तुमचा बनवा

नागराज मंजुळेंना असं कधीच पाहिलं नसेल! आकाश ठोसरपेक्षा होतेय त्यांच्याच स्वॅगची चर्चा


मुंबई: नागराज मंजुळेचा सिनेमा (Nagraj Manjule Upcoming Film) म्हटलं की काहीतरी वेगळा विषय हे ठरलेलच आहे! नागराज यांनी ‘झुंड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी समीक्षक आणि विविध कलाकारांकडून मात्र वाहवा मिळवली. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड आणि दक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार्सनी या सिनेमाचं कौतुक केलं होतं.

आता नागराज आणखी एका सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा सिनेमा मराठी-हिंदीसह इतर दोन दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे. ‘नागराज पोपटराव मंजुळे’ आणि ‘झी स्टुडिओज’ची निर्मिती असणाऱ्या या सिनेमाचं नावच भन्नाट आहे. हा ‘घर बंदुक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani Teaser Out) या हटके नावाचा सिनेमा असणार आहे. गेल्यावर्षीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत जंगल अवताडे यांच्याकडे आहे.

हे वाचा-हृता दुर्गुळे पुन्हा एकदा दिसणार झी मराठीवर, वाचा कधी आणि किती वाजता?

या सिनेमाच्या ‘घर बंदुक बिरयानी’ या नावाप्रमाणे कास्टही हटकेच आहे. या सिनेमाचा टीझर समोर आला असून यामध्ये नागराज मंजुळे, सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) दिसत आहेत. नागराज आणि आकाश ही जोडी मोठ्या पडद्यावर हिट ठरलेली जोडी आहे. आता पुन्हा एकदा ते हिंदी चित्रपट गाजवायला सज्ज आहेत. त्यात आता नागराज आणि आकाश यांच्यासोबत सयाजी शिंदे असल्याने प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

हे वाचा-उपकार आणि भोचकपणा अजिबात नको… असं काय बोलून गेला संतोष जुवेकर?

व्हायरल होतोय टीझर

झी स्टुडिओजने शेअर केलेला ‘घर बंदुक बिरयानी’चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना नागराजचा नेहमीपेक्षा वेगळा अंदाज आवडला आहे. शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे नागराज मंजुळे या सिनेमात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या हिंदी टीझरवर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नागराज मंजुळे यांचा स्वॅग प्रेक्षकांना आवडला आहे.

हेही वाचा -  'द कश्मीर फाइल्स'पासून 'उरी'पर्यंत हे राजकीय सिनेमे निवडणुकीदरम्यान झाले प्रदर्शित

सिनेमाच्या टीझरवरुन असे वाटते आहे की, यामध्ये पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील चकमक पाहायला मिळणार आहे. ‘घर बंदुक बिरयानी’ या नावावरुन आणि टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या बॅकग्राउंड गाण्याद्वारे यामध्ये डार्क कॉमेडीची झलक पाहायला मिळू शकते. मात्र या सिनेमात नेमकं काय असेल हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next विराटने नव्हे तर भारताच्या या खेळाडूने दिला पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका; पाहा घडलं तरी काय?

Check Also

VIDEO: दिल्लीत जाऊन मुंबईबद्दल असं काही बोलली तापसी की नेटकरी संतापले

मुंबई: अनेक गाजलेले चित्रपट देणारी अभिनेत्री अशी तापसी पन्नूची ओळख आहे. तिनं आतापर्यंत केलेल्या चित्रपटांत …

सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! पंजाबी सिंगर अफसाना खानची NIA चौकशी

मुंबई,  25 ऑक्टोबर :  पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल …