मोहम्मद रफींच्या बायकोचा चुकूनही होत नाही कुठेच उल्लेख, कारण…!

मोहम्मद रफी हे बॉलीवूड मधील एक असे नाव जे कोणीच कधीच विसरणार नाही. त्यांचे नाव अजरामर आहे आणि अर्थात त्यामागे त्यांचे अगाध असे कर्तुत्व आहे. त्यांनी संगीतकार आणि गायक म्हणून घडवलेला इतिहास पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी एक मौल्यवान वारसा ठरेलं हे नक्की! आज सुद्धा एवढ्या वर्षांनी त्यांची गाणी त्याच चवीने ऐकली जातात आणि आजही ऐकणार मंत्रमुग्ध होतो हे विशेष! अजून कित्येक वर्षे हीच जादू दिसेल हे देखील खरे! तर अशा या महान व्यक्तिमत्त्वाची कारकीर्द जरी एवढी भारी असली तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र थोडं खाली-वरच होत राहिलं.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत एक असा किस्सा आहे ज्याबाबत त्यांचे कुटुंबिय सुद्धा कधीच एक उच्चारही काढायचे नाहीत. ही गोष्ट त्यांचे पहिले लग्न आणि पहिल्या पत्नीबाबत होती. ते दोघे वेगळे झाले आणि मोहम्मद रफींच्या आयुष्यात एक मोठा बदल निर्माण झाला. हा किस्सा सांगतो की कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीसाठी भावना गरजेच्या असतात आणि दुस-या व्यक्तीसाठी गरजा व कामावरील प्रेम महत्वाचं असतं. या तफावतीमुळे शेवटी वेगळे मार्ग निवडावे लागतात. मोहम्मद जींच्या आयुष्यातील मन हेलावणारा हा किस्सा नक्की काय आहे? (फोटो साभार : बीसीसीएल)

पहिल्या लग्नाबाबत फार कमी लोकांना माहित होतं

मोहम्मद रफी यांच्या पहिल्या लग्नाबाबत फार कमी लोकांना माहिती होती. यास्मिन खालिद रफी यांनी स्वत: लिहिले पुस्तक ‘मोहम्मद रफी मेरे अब्बा… एक संस्मरण’ यामध्ये त्यांच्या पहिल्या लग्नाचा उल्लेख आढळतो. यात सांगितले गेले आहे की फार कमी वयातच मोहम्मद रफी यांचा बशिरा बानो यांच्याशी पैतृक गावामध्ये निकाह झाला होता. पण भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि याच वेळी झालेल्या हिंसेदरम्यान दोघांचे मार्ग वेगळे झाले.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली टॉय कार शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

(वाचा :- माझी कहाणी : मी बायकोची फसवणुक करतोय, एकाच घरात राहून बायकोच्या मोठ्या बहिणीसोबत मी असं काही केलं की….!!)

दोघांच्या वेगवेगळ्या गरजा

झालं असं की, या हिंसेमध्ये बशीराने आपल्या आई-वडिलांना गमावले. यामुळे त्या एवढ्या घाबरल्या होत्या की त्यांनी पाकिस्तानमधील लाहोर मध्येच राहण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे मोहम्मद रफी मात्र आपल्या सिंगिंग करियरला पुढे नेण्यासाठी मुंबई मध्येच राहू इच्छित होते. दोघांचे नाते अचानक त्या पॉइंटला येऊन पोहोचले की ज्यात दोघांच्या भावना आणि गरजा यांमध्ये मोठे अंतर निर्माण झाले आणि दोघे पती पत्नी विभक्त होऊन वेगवेगळ्या देशांत राहू लागले.

(वाचा :- माझी कहाणी : लग्न करून मी उद्धवस्त झालीये, नव-याची वागणुक अशीच राहिली तर मी लवकरच पागल होईन, कशी सुटका मिळवू?)

जेव्हा संवादच होत नसतो

मोहम्मद रफी असे एकटे व्यक्ती नाहीत ज्यांना अशा प्रकारच्या स्थितीचा सामना करावा लागला. आज देखील अशाच प्रकारच्या कारणांमुळे लग्न मोडतानाची खूप प्रकरणे आपल्याला दिसतात. ज्यामध्ये अचानक नात्यात अत्यंत विचित्र परिस्थिती उद्भवते आणि नवरा बायको कडे एकमेकांशी बोलयला सुद्धा काही नसते. दोघे कायमचे अबोल होऊन जातात. असे तेव्हा होते जेव्हा दोन्ही पार्टनर साठी प्राथमिकता आणि गरजा वेगवेगळ्या होऊन बसतात आणि दोघेही एकमेकांना समजून घेण्यास व तडजोड करण्यास तयार नसतात.

हेही वाचा :  Stretching Exercise : दिवसभर एका जागी बसून डॅमेज होतात शरीरातील सर्व नसा, करीनाची डाएटिशियन ऋजुताने सांगितल्या 10 मिनिटांच्या ‘या’ 8 एक्सरसाइज!

(वाचा :- माझी कहाणी: गेल्या 5 वर्षापासून मी आई बनू शकली नाही, नव-याला जडलाय विचित्र छंद, कारण ऐकून पायाखालची जमिन सरकेल)

पहिल्या पत्नीबाबत बोलण्याची होती मनाई

मोहम्मद रफी यांनी नंतर बिलकीस यांच्याशी दुसरे लग्न केले. दोघांना तीन मुले आणि तीन मुली झाल्या. असे म्हणतात की बिलकीस यांना मोहम्मद रफी यांच्या पहिल्या पत्नीबाबत उल्लेख केलेला सुद्धा सहन होत नसते. तिला पहिल्या पत्नीबाबत कधीच चर्चा केलेली आवडत नसे. याच मुळे मोहम्मद रफी यांच्या घरात बशिरा यांच्याबद्द;लं अवाक्षरही काढले जात नसे. बिलकीस यांचे हे वागणे स्वाभाविक होते. कारण कोणत्याच पार्टनरला आपल्या जोडीदाराच्या एक्सचा उल्लेख आवडत नसतो.

(वाचा :- Real Stories : माझ्याइतकी वाईट पत्नी कोणीच नसेल.. मीच माझ्या नव-याला धोका द्यायाला पाडलं भाग.. कारण..!!)

मोहम्मद रफींच्या आयुष्यातून काय शिकायला मिळते?

मोहम्मद रफी यांचा हा किस्सा सर्वच कपल्सना एक गोष्ट सांगून जातो जी समजून घेणे खुप महत्त्वाचे आहे. मोहम्मद रफी आणि त्यांच्या पत्नीला जो निर्णय घ्यावा लागला तो दुर्दैवी होता. पण दोघांनी त्याच भूतकाळात जगात राहण्याला प्राधान्य दिले नाही. दोघांनी आपल्या आयुष्याचा मार्ग निवडला आणि सुखाने आयुष्य जगले. मोहम्मद रफी यांचे दुसरे लग्न हे खूप यशस्वी ठरले. त्यांनी संसार सुख उपभोगले. मोहम्मद रफी यांची ज्या सकरात्मकतेने आयुष्याकडे पाहिले त्याच सकारात्मकतेने जर प्रत्येक व्यक्तीने पाहिले तर दु:खाचेही सोहळे नक्की होतील.

हेही वाचा :  संजय राऊत म्हणाले, '40 आमदारांनी मोदींचा फोटो लावावा आणि जिंकून दाखवा, जिंकल्यास राजकारण सोडेन...'

(वाचा :- माझी कहाणी : नव-याने अक्षरश: भंडावून सोडलंय, भावासोबत बोलणंही गुन्हा वाटू लागलंय, कसा वाचवू या प्रकारातून जीव?)

पास्टमध्ये जगणं

एक्सचा पुन्हा पुन्हा उल्लेख करणे म्हणजे भूतकाळाची पाने पुन्हा पुन्हा पलटण्यासारखे आहे. जेव्हा रिलेशनशिपचा विचार केला जातो तेव्हा पूर्वीच्या जोडीदाराबद्दल विचार करणे, बोलणे इत्यादी गोष्टी सध्याच्या जोडीदारामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. यामुळे जरी तुम्ही तुमच्या एक्सबाबत विचार करत नसलात तरीही गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्याच्याबद्दल सतत बोलल्याने तुमच्या जोडीदाराला असे वाटू शकते की तुम्ही मुव्ह ऑन केले नाही आणि सध्याच्या नात्यात तुम्ही 100% वचनबद्ध नाही आहात.

(वाचा :- माझी कहाणी: होणारा नवरा व माझी रोज टोकाची भांडणं होतात, फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी आम्ही एकत्र आहोत, ऐकून हादराल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …