मीरा नेहमीच चित्रपटांपासून दूर राहिली, पण म्हणून तिने स्टायलिश राहणे काही सोडले नाही. शेवटी आहे आहे पण स्टायलिश स्टार शाहीद कपूरची पत्नी, त्यामुळे तिला ते कसब चांगलंच जमतं. ती नेहमीच आपल्या बॉडी टाईपनुसार कपडे निवडते आणि म्हणूनच तिचा प्रत्येक लुक सक्सेसफुल ठरतो. नुकतीच एका पार्टीसाठी ती आपल्या पतीसह पोहोचली आणि तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वचजण घायाळ झाले.
शाहीद सोबत पार्टीमध्ये पोहोचली मीरा
मीरा राजपूतने बॉलीवूडच्या या पार्टीसाठी एक खास ड्रेस निवडला होता, ज्यामध्ये तिचा लुक खूपच जास्त हॉट दिसत होता. ती नेहमीच अशा प्रकारच्या आउटफिटमध्ये एवढी भारी दिसते की तिच्या समोर भल्या भल्या हॉट आणि बोल्ड लुक कॅरी करणाऱ्या अभिनेत्री फिक्या पडतात. केवळ मीराच नाही तर शाहीद सुद्धा अगदी हँडसम ड्यूड बनून या पार्टीमध्ये आला होता. त्याची जीन्स एवढी स्टायलिश होती की प्रत्येक जण त्याच्याकडून काही फॅशन आयडीयाज घेऊ शकतो. शाहीदची हेअरस्टाईल देखील त्याला अगदी स्मार्ट लुक देत होती.
(वाचा :- टाइट मिनी स्कर्ट व ब्रालेट टॉप, मलायकाचा बोल्ड लुक व्हायरल, बॉयफ्रेंडसोबत रोमांस बघून फॅन्सच्या मनात फुटले लाडू)
बोल्ड कटने खेचले ध्यान
मीराने जो पीच पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता त्यावर फ्लोरल प्रिंट्स दिसून येत होते. ग्रीन शेडमध्ये हे फ्लोरल प्रिंट्स ड्रेसला अगदीच सुंदर बनवत होते. शिवाय हा आउटफिटची डिटेलिंग देखील अगदी कमाल होती. ड्रेसमध्ये डीप प्लंजिंग नेकलाइन दिली होती, ज्यामध्ये मीराचे क्लीवेज पोर्शन रिव्हील होताना दिसत होता. हा बोल्ड कट मीराच्या एकंदर लुकला सेक्सी बनवत होता हे विशेष आणि मीरा त्यामध्ये अगदीच सेक्सी दिसत होती हे देखील खरे!
(वाचा :- कशाला हवे डीप व बोल्ड ड्रेस, ब्लॅक ट्रान्सपरंट साडी व बोल्ड ब्लाउजमध्ये जान्हवी कपूरचा राडा, फिगरवर लाखो घायाळ)
असे फ्लॉन्ट केले कर्व्हस
या ड्रेसची बलून सिल्व्ह्स सुद्धा स्टाईल वाढवण्याचे काम करत होती. मीराच्या या आउटफिटमध्ये बिलो द बस्ट एरिया वर क्रॉस डिटेलिंग दिली गेली होती, जी तिच्या फिगरला हायलाईट करण्याचे काम करत होती. या टाय-अप डिटेलमुळे ड्रेसची फिटिंग वेस्टलाईन पर्यंत एकदम टाईट होती आणि हेच कारण होते की मीरा आपले कर्व्हस फ्लोन्ट करताना नजर आली.
(वाचा :- अरबाजची एक्स वाईफ मलायकाच्या बोल्डनेसला लावली गर्लफ्रेंड जॉर्जियाने कात्री, छोटासा स्कर्ट घालून पेटवलं वातावरण)
असा कम्प्लिट केला लुक
मीराचा हा ड्रेस वेस्टलाइनच्या खाली एकदमच फज फ्री स्टाईल मध्ये होता, यामुळे तिला चांगलाच कम्फर्ट मिळत असावा. शिवाय मॅचिंग हील्स आणि कानांमध्ये ड्रॉपडाउन ईयररिंग्स परिधान करून तिने आपला हा लुक कम्प्लीट केला. तिने मिनिमल मेकअप सह केसांना मोकळे सोडले होते. एकंदर मीराचा हा लुक तिच्या आजवरच्या बोल्ड लुक्स पैकी सर्वात सुंदर बोल्ड लुक्स पैकी एक ठरला. तिच्या या लुकचे पार्टीत देखील अनेकांनी कौतुक केले आणि मीराने स्वत:ला स्टाईल करण्यात जी मेहनत घेतली होती ती सक्सेसफुल ठरली.
(वाचा :- न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल झालेल्या रणवीरचं अजून एक क्लासी फोटोशूट समोर, नेटकरी म्हणाले, ‘तुझ्याकडे कपडेही आहेत तर..’)
असा होता शाहीदचा लुक
मीराचा लुक तर आपण पाहिला, पण एक पार्टनर म्हणून शाहीदचा लुक सुद्धा आगदी साजेसा होता आणि एक हँडसम हिरो म्हणून ज्यासाठी त्यच्याकडे पाहिलं जात तो चार्म या लुकमध्ये सुद्धा कायम होता. शाहीदने ब्ल्यू टी शर्ट सह डिस्ट्रेस्ड फ्लेयर्ड जीन्स परिधान केली होती. ही जीन्सच त्यच्या पूर्ण लुक मधला युएसपी होती. सोबत व्हाईट शूज परिधान करून त्याने आपला लुक कम्प्लीट केला होता. तर या पार्टीमध्ये दोघांच्या अनोख्या स्टाईल सेन्स सह त्यांची जबरदस्त केमिस्ट्री सुद्धा पहायला मिळाली आणि पुन्हा एकदा ते क्युट कपल का आहेत ते सिद्ध झाले.
(वाचा :- छोटासा टॉप व शॉर्ट पॅंटमध्ये प्रियांका चोप्राने माजवला सोशल मीडियावर कहर, मालती मेरीच्या आईची फिगर बघून चाहत्यांना चक्कर)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या