“मी, राहुल आणि प्रियांका राजीनामा देण्यास तयार आहोत”; पाच राज्यांतील पराभवानंतर सोनिया गांधींची प्रतिक्रिया | Sonia Gandhi remain Congress president decide party leaders cwc meet abn 97


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातील कृतीबाबत रविवारी काँग्रेस कार्यकारिणी चर्चा झाली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातील कृतीबाबत रविवारी काँग्रेस कार्यकारिणी चर्चा झाली. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत सोनिया गांधींनी राजीनामा देऊ केला आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत. मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यास नकार दिला आहे.

सोनिया गांधी यांनी स्वतःशिवाय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा उल्लेख केला आहे. आपण तिघेही राजीनामा देण्यास तयार आहोत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. याला दुजोरा देताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या कुटुंबीयांसह मी पक्षातील आपले पद सोडण्यास तयार असल्याचे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, परंतु आम्ही ते नाकारले.”

चार तासांहून अधिक काळ बैठक

हेही वाचा :  Maratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात, टिकणारं आरक्षण देऊ...; 'सरसकट' शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम!

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था सीडब्ल्यूसीची बैठक पक्षाच्या मुख्यालयात चार तासांहून अधिक काळ चालली. सोनिया गांधींशिवाय, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते.

यामध्ये जी२३ गटाचे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक यांनीही सहभाग घेतला. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित नव्हते. कोविड १९ ची लागण झाल्यामुळे ज्येष्ठ नेते ए के अँटनी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

सोनिया गांधीच पक्षप्रमुख

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव होऊनही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात कोणताही बदल झालेला नाही. रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीत पक्षाची जबाबदारी सोनिया गांधी यांच्या हातात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्या हातात असेल. मात्र, सोनिया गांधी यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे मान्य केले आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सांगितले की, “काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसचे नेतृत्व करतील आणि भविष्यातही असाच निर्णय घेतील. आपल्या सर्वांचा त्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे.” एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, सीडब्ल्यूसीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर एकमताने विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा :  विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (महिला) : स्मृती, हरमनप्रीतचा झंझावात; भारताची वेस्ट इंडिजवर मात | Cricket World Cup Womens Smriti Harmanpreets Storm India beat West Indies ysh 95

‘चिंतन शिबिरात’ पुढील निर्णय

सोनिया गांधी यांनी बैठकीत सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ‘चिंतन शिबिर’ आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये पुढील रणनीती आखली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी

या बैठकीपूर्वी गेहलोत, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि इतर अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेहलोत म्हणाले की, आजच्या काळात राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पूर्ण ताकदीने लढत आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …