मराठमोळ्या अभिनेत्याने मुलाला दिलं ‘अ’ अक्षरावरुन खास नाव, वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाळाला जन्म

झी मराठीवरील ‘भागो मोहन प्यारे’ मालिकेत भुताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सरिता मेहेंदळे जोशी नुकतीच आई झाली आहे. 2024 हे वर्ष सरितासाठी अतिशय खास आहे. अगदीच 1 जानेवारी 2024 रोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सरिताने तिच्या बाळाचं नाव देखील जाहीर केलं आहे. 

सरिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एक क्यूट फोटो शेअर केला. ज्यामध्ये सरिता तिचा पती आणि बाळाचा हात असा फोटो दिसत आहे. बाळाच्या हातावर गोड ब्रेसलेट आहे त्यावरुन त्याच्या नावाचा अंदाज येत आहे. “आमच्या आयुष्यातील नवीन प्रेम, आमचा छोटा चमत्कार…” आणि यापुढे तिने बाळाचं नाव आणि त्याचा अर्थही जाहीर केला आहे. 

अभिनेत्रीच्या मुलाचं नाव 

‘अन्वित’ असं सरिताच्या मुलाचं नाव. ‘अन्वित’ या नावाचा अर्थ आहे शौर्य आणि लीडरशिप असं लिहिलं आहे. “अ” अक्षरावरुन हे अतिशय गोड नाव आहे.  दरम्यान, सरिताला 1 जानेवारी 2024 रोजी मुलगा झाला. तिने ‘इट्स अ बॉय’ लिहिलेला एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच कॅप्शनमध्ये बाळाच्या जन्माची तारीखही सांगितली होती.

 

हेही वाचा :  Xiaomi युजर्सना मोठा झटका! Gallery मधील फोटो होणार कायमचे डिलीट

‘अ’ अक्षरावरुन मुलांची नावे

अकलंक – लंक, डाग नसलेला

अग्रसेन – सेनेच्या अग्रभागी असणारा

अग्निमित्र – अग्निचा मित्र

अखिल – संपूर्ण

अगस्ति – सुप्रसिद्ध ऋषी

अग्रज – मोठा मुलगा

अखिलेंद्र – सर्व विश्वाचा स्वामी

अचल – स्थिर, पर्वत. दृढ राहणारा

अच्युत – कृष्णाचे एक नाव

अचलेंद्र – पर्वतश्रेष्ठ, पर्वतांचा राजा हिमालयाचे एक नाव

अज – ईश्वर

अजातशत्रु – कुणीही शत्रू नसलेला

अजितेश – विजयी देव

अजेय – पराभव न पावणारा

अजय – ज्याला कुणीही हरवू शकत नाही असा

अतुल – अद्वितीय

अतीत – पलीकडला

मुलांची नावे आणि अर्थ 

आदित्य –  सूर्य, उगम, सुरुवात

अजय अजिंक्य, विजयी

अमोलअमूल्य, मोलवान

अनंतअमर्याद, न संपणारी

अनंतनाथअनंताचे नाथ, भगवान शिव

अंकितलिहिलेला, ठरवलेला

अक्षयनष्ट न होणारा, नित्य

अरविंदसूर्य, तेजस्वी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …