Delhi Crime News: प्रेमाचे 40 वार; पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या पण, पिडीतेची आई म्हणते…

Delhi Crime News: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका धक्कादायक प्रकरणामुळे हादरली आहे. तरुणीसोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपीने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दगडाने देखील वार करत प्रेयसीला (Delhi Teens Murder) संपवलं. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. मन सून्न करणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Video) झाली आहे. गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीची हत्या होत असताना आसपासच्या लोकांनी त्याला अडवण्याचा देखील प्रयत्न केला नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

आरोपीच्या मुसक्या आवळल्या 

अल्पवयीन मुलीचा मारेकरी साहिल (Sahil) याला दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आली. बुलंदशहर येथून पोलिसांनी आरोपीच्या (Sahil Arrested By Delhi Police) मुसक्या आवळल्या. दिल्ली पोलिसांनी 12 तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे. मात्र, कायदा आणि सुव्यस्थेवर (Law And Order) पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. 

पिडितेची आई काय म्हणाली?

गेल्या 10 दिवसापासून ती नितूच्या घरी राहत होती. तिने नुकतीच 10 वी परीक्षा दिली होती आणि ती चांगल्या मार्काने पास देखील झाली होती. ती कधीही साहीलबद्दल काहीही बोलली नाही. तो कोण आहे आम्हाला माहिती देखील नाही. आम्हाला न्याय पाहिजे, आरोपीला फासीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी पिडीतेच्या आईने केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणतात…

दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हे अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. गुन्हेगार बेधडक झाले आहेत, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. एलजी साहेब, कायदा आणि सुव्यवस्था ही तुमची जबाबदारी आहे, काहीतरी करा. दिल्लीतील लोकांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे, असं ट्विट अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी केलं आहे.

स्वाती मालीवाल यांचं ट्विट

महिला आणि मुलींसाठी दिल्ली अत्यंत असुरक्षित बनली आहे. मी केंद्र सरकारला केंद्रीय एचएम, दिल्ली एलजी, डीसीडब्ल्यू प्रमुख आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलवावी, असं आवाहन दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी केलं आहे.

हेही वाचा :  दिवसा शिक्षक रात्री हमाल... 'हा' व्यक्ती इतकी जीव तोड मेहनत का करतोय?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …