…अन् मित्रासाठी माकडांनी बिबट्याला पळवून पळवून मारलं, पाहा अविश्वसनीय VIDEO

बिबट्याने (Leopard) हल्ला करत एखाद्या प्राण्याची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ (Video) तुम्ही पाहिले असतील. त्यामुळेच बिबट्याने शिकार करत एखाद्या प्राण्याला भक्ष्य केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण वानरांनी बिबट्यावर हल्ला केल्याचं कधी पाहिलं आहे का? नाही ना… पण असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर निसर्ग किती आश्चर्यकारक आहे याची जाणीव होते. व्हिडीओत तब्बल 50 वानरं एका बिबट्यावर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान रस्त्याच्या मधोमध हा थरार रंगल्याने वाहतूक काही वेळासाठी थांबली होती. 

दक्षिण आफ्रिकेतील ग्रामीण भागात ही घटना घडली आहे. रस्त्यावर वानरं आणि बिबट्यात संघर्ष सुरु झाल्याने येथे वाहतूक काही काळासाठी थांबली होती. Latest Sightings या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, Ricky da Fonseca यांनी सर्वप्रथम हा व्हिडीओ शेअर केला होता. 

व्हिडीओच्या सुरुवातीला एक बिबट्या रस्त्याच्या किनारी चालताना दिसत आहे. बिबट्या यावेळी शिकारीच्या शोधात होता. यानंतर रस्त्याच्या मधोमध वानरांचा एक मोठा कळप चालताना दिसत आहे. वानरं दिसल्यानंतर बिबट्याला आपल्याला शिकार सापडल्याचा आनंद होतो. यानंतर बिबट्या त्यांच्या दिशेने वेगाने धावत सुटतो. आपणं शिकार करु आणि नंतर इतर सर्व वानरं पळून जातील असं बिबट्याला वाटलं असावं. पण बिबट्याचा हा आत्मविश्वास फार मोठा गैरसमज ठरला. 

हेही वाचा :  5 दिवसांच्या लेकीसह आईने असे भयानक कृत्य केले की शेजाऱ्यांचा थरकाप उडाला; पोलिसही चक्रावले

बिबट्याने धाव घेतल्यानंतर सुरुवातीला सर्व वानरंही पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळी बिबट्या त्यांच्यातील एका वानराला पकडतो तेव्हा मात्र इतर सगळेजण मागे फिरतात आणि बिबट्यावर तुटून पडतात. जोवर बिबट्या पळून जात नाही तोवर वानरं त्याच्यावर हल्ला करतात. 

वानरं इतक्या मोठ्या संख्येत असल्याने बिबट्या प्रयत्न करुनही स्वत:ला वाचवू शकत नाही. यानंतर अखेर तो पळ काढतो. पण यानंतरही वानरं त्याचा पाठलाग सोडत नाही. दरम्यान रस्त्यावर हा थरार सुरु असल्याने गाड्या काही वेळासाठी तशाच थांबल्या होत्या. जोवर वानरं आणि बिबट्या रस्त्यावरुन खाली उतरत नाहीत तोवर गाड्या तशाच थांबलेल्या होत्या. 

ही पोस्ट 15 ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. या व्हिडीओला YouTube वर 200,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …