Loan Rate : ‘या’ बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका

Loan Interest Rate : घर, वाहन किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करायची झाली, की मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी कर्ज हा एकमेव आणि तितक्याच मदतीचा पर्याय ठरतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कर्जावरील हप्ते/ व्याज वाढल्यामुळं हा पर्यायही हिशोबाचं गणित बिघडवतानाच दिसत आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीमुळं देशातील काही बड्या बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदर वाढवला. तर, काही बँकांनी व्याजर वाढणार असल्याचं म्हणत ग्राहकांना सतर्क केलं. तुमच्या बँकेचा व्याजदर वाढला तर नाहीये? पाहून घ्या… 

HDFC Bank / एचडीएफसी बँक 

एचडीएफसी बँकेकडून निवडक कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 15 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 7 ऑगस्टपासून हे नवे दर लागू झाले आहे. MCLR ते दर असतात ज्यांच्या आधारे बँकेकडून कार, घर किंवा खासगी कर्जाचा व्याजर निर्धारित केला जातो. 

Bank of Baroda/ बँक ऑफ बडोदा 

बँक ऑफ बडोदाकडूनही सर्वसमावेशक एमसीएलआर 5 आधार अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी वाढवण्यात आला. हे नवे दर 12 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले. या वाढीसह बँकेचा वार्षिक एमसीएलआर 8.00 टक्क्यांवर गेला. 

हेही वाचा :  Paytm, GPay, Bhim App वापरताय? मग चुकूनही या गोष्टी करु नका, नाहीतर व्हाल कंगाल

Bank Of India/ बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियाकडून निवडक कालावधीसाठीच्या एमसीएलआरमध्ये वाढ केल्यानंतर ओवरनाईट एमसीएलआर 7.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, तीन आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.30 आणि 8.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

ICICI Bank/ आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेकडून एमसीएलआर 5 अंकांनी वाढवण्यात आला असून, आता या वाढीनंतर त्याचा एकूण आकडा 8.40 टक्क्यांवर गेला आहे. तीन आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.45 आणि 8.80 टक्क्यांवर गेला आहे. 

बँकांकडून अनेकांनीच गृह, वाहन आणि खासगी कर्ज घेतलेलं असताना आरबीआयच्या सातत्यानं बदलणाऱ्या पतधोरणांचा व्याजदरावर थेट परिणाम होतो. मागील काही महिन्यांमध्या व्याजदरांत झालेली वाढ पाहता कर्जसाठी विचारणा करणांचीही द्विधा मनस्थिती झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …