LPG Cylinder : तुम्हाला माहितीय गॅस सिलिंडरवरील ‘या’ अंकांचा अर्थ? हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं

मुंबई : घरातील एलपीजी सिलिंडरला आग लागण्याच्या किंवा त्याच्या स्फोट झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. यामागे गॅस गळती आणि शॉर्ट सर्किट ही मुख्य कारणे असतात. त्याच सोबत यामागे आणखी एक गोष्ट आहे. ज्याच्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. ते म्हणजे एक्सपायरी झालेलं सिलिंडर. हो तुम्ही बरोबर एकलंत, सिलिंडरला देखील एक्सपायरी डेट असते. अग्निशमन विभागाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार स्वयंपाकघरात आग लागण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे एलपीजी सिलेंडरची मुदत संपणे. इतर वस्तूंप्रमाणेच, एलपीजी सिलिंडरचीही मुदत संपण्याची तारीख असते. हा कालावधी संपल्यानंतर, सिलिंडर जुने होतात आणि गॅसचा दाब सहन करू शकत नाहीत. ज्यामुळे आग लागणे किंवा स्फोट यांसारख्या गंभीर घटना घडतात.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नसते. ज्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे  विक्रेत्याकडून एलपीजी सिलिंडर घेताना एक्सपायरी डेट नक्की तपासा. परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर सिलिंडरची एक्सपायरी डेट असते. तर मग ती कुठे असते? कारण त्यावर इतर वस्तुंप्रमाणे तारीख टाकलेले नसते. मग हे कसं ओळखायचं?

तर ही तारीख सिलिंडरच्या वरच्या भागावर लिहिलेली असते. तुम्ही तिकडे लक्षपूर्वक पाहिल्यास, तुम्हाला A, B, C किंवा D मधून एक संख्या लिहिलेली दिसते. तसेच त्या क्रमांकासमोर 22, 23, 24 किंवा असा कोणताही अंक लिहिलेला असतो. हा एकप्रकारचा कोड आहे, जो तुम्हाला एक्सपायरी डेट ओळखण्यासाठी मदत करतो.

हेही वाचा :  Telangana Crime : सरकारी अधिकाऱ्याने 7 कोटींसाठी रचला स्वतःच्या हत्येचा बनाव; धक्कादायक घटनाक्रम पाहून पोलिसही चक्रावले

आपल्याला हे माहित आहे की, वर्षाचे 12 महिने असतात, जे इंग्रजीच्या या चार अक्षरांना 3-3 महिन्यांमध्ये रिप्रेजेंट करतात. उदार्णार्थ A अक्षर जानेवरी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्‍यानसाठी वापरले जातील. B हे अक्षरे एप्रिल, मे आणि जूनसाठी असते. C हे अक्षरे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी असते आणि D हे अक्षरे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी असते.

आणि या अक्षरांनंतर येणारी संख्या आपल्याला त्याच्यावरील साल दर्शवते. उदाहरणार्थ, जर तुमच्या सिलेंडरवर B.24 लिहिलेले असेल, तर याचा अर्थ तुमच्या सिलेंडरची एक्सपायरी तारीख जून 2024 आहे. दुसरीकडे, जर ते C.26 असे लिहिलेले असेल, तर याचा अर्थ असा की, तुमचा सिलेंडर सप्टेंबर 2026 पर्यंत चालू शकेल. त्यानंतर ते बदलले पाहिजे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास त्याच्या स्फोटाचा धोका वाढतो.

सिलेंडरचे आयुष्य 15 वर्षे असतं

घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या कोणत्याही एलपीजी सिलेंडरचे कमाल आयुष्य 15 वर्षे असते. या काळात गॅस कंपन्या त्या सिलिंडरची दोनदा चाचणी करून क्षमता तपासतात. पहिली चाचणी 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरी चाचणी 10 वर्षांनी केली जाते. हे चाचणी तपशील तुमच्या सिलेंडरच्या वर देखील लिहिलेले जाते

हेही वाचा :  चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?

त्यामुळे पुढच्या वेळेपासून सिलिंडर घेताना त्यावरील एक्सपायरी डेट चेक करा आणि जर ही डेट निघून गेली असेल, तर असे सिलिंडर घेण्यास नकार द्यावा.

तुमच्या कुटुंबातील कोणालाही अशी समस्या येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर ही माहिती तुम्हीही तुमच्या जवळच्या मंडळीपर्यंत नक्की शेअर करा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …