Fastest Food Delivery 10 Seconds: ‘ही’ ट्रीक वापरुन अवघ्या 10 सेकंदांमध्ये मिळवली फूड डिलेव्हरी; Video होतोय Viral

10 seconds food app delivery: भूख कधीही, कोणालाही आणि कुठेही लागू शकते असं म्हटलं जातं. अनेकांना तर भूख सहन होत नाही. मग ते घरातील जेवण असो किंवा बाहेरुन मागवलेलं जेवण असो लगेच पोटात काहीतरी गेलं पाहिजे असा या लोकांचा हट्ट असतो. अनेकदा अवेळी भूक लागल्यास लोक 24 तास सेवा पुरवणाऱ्या अॅप सेवेची (food delivery app) मदत घेतात. मात्र एका व्यक्तीने अशाप्रकारे जोरदार भूक लागलेली व्यक्ती बर्गर खाण्यासाठी मॅकडॉनल्ड रेस्तराँमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या हाती निराशाच लागली. कारण रेस्तराँ बंद झाल्याचं या व्यक्तीला समजलं. मात्र समोर त्याला असं काही दिसलं की त्याने डोकं लावून अगदी 10 सेकंदांमध्ये बर्गर मिळवलं.

कोणी शेअर केला आहे हा व्हिडीओ?

ट्विटरवरील @caleb_friesen2 नावाच्या हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्त खास ट्रिक वापरुन फूड ऑर्डर करतो की 10 सेकंदांमध्ये खाणं त्याला मिळतं. खरं तर यामुळे ही आतापर्यंत सर्वात वेगवान फूड डिलेव्हरी असल्याचं म्हणता येईल. ऑर्डर करणारा आणि डिलेव्हरी करणारा दोघेही यामुळे स्वत: थक्क झाले आहेत.

हेही वाचा :  लोकं इथे आलिशान कारपेक्षा बकऱ्या का विकत घेत आहेत... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

…अन् 10 सेकंदांमध्ये मिळाली डिलेव्हरी

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती खास ट्रिक वापरुन केवळ 10 सेकंदांमध्ये फूड डिलेव्हरी मिळवतो. त्यानंतर डिलेव्हरी देणारा आणि घेणाराही ही सर्वात वेगवान फूड डिलेव्हरी असल्याचं सांगता दिसतो. खरं तर ही व्यक्ती मॅकडॉनल्ड रेस्तराँमध्ये पोहोचली तेव्हा ते बंद असल्याने तिचा हिरमोड झाला. मात्र तेव्हा त्याला पिकअप विंडोवर अनेक डिलेव्हरी बॉइज दिसले. ती गर्दी पाहूनच त्याला एक कल्पना सूचली. त्याने स्विगीवरुन मॅकडॉनल्डवर ऑर्डर केली. या व्यक्तीने डिलेव्हरी लोकेशन तेच मॅकडॉनल्ड रेस्तराँत असा पर्याय निवडला. त्यानंतर ही ऑर्डर स्वीकरणाऱ्या डिलेव्हरी बॉयने पिकअप विंडोवर कलेक्ट केलेलं आणि शिड्या उतरुन खाली आल्यावर हे फूड बॉक्स 10 व्या सेकंदाला या व्यक्तीच्या हाती दिलं. हा सारा प्रकार पाहून दोघेही हसू लागले.

कॅप्शनमध्ये दिली माहिती

व्हायरल व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये, “मध्यरात्री मी मॅकडॉनल्ड्सच्या कोरमंगला येथील ब्रँचमध्ये गेलो होतो. मात्र ते बंद झालं होतं. तरी तेथे पिक-अफ विंडोवर डिलेव्हरी बॉइजची मोठी गर्दी होती. काय करावं असा विचार करत असतानाच मी स्विगीवरुन मॅकडॉनल्ड्सवरुन मॅकडॉनल्ड्समध्येच ऑर्डर केली. 10 सेकंदांमध्ये या व्यक्तीला डिलेव्हरी मिळाली,” असं म्हटलं आहे.

डिलेव्हरी एजंटचं नावं संजय असल्याचं सांगितलं जात आहे. संजय स्वत: युट्यूबवर फार सक्रीय आहे.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची किल्ले संवर्धनासाठी मोठी घोषणा, इतक्या कोटींची तरतूद



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …