रेल्वे अपघातात गमावले दोन्ही पाय आणि एक हात, घरात चारही विश्व दारिद्र्य; तीन बोटांच्या आधारे उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

UPSC Civil Exam Result: ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ म्हणजेच प्रयत्नाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. पण याचं प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपुरी येथील सूरज तिवारी (Sooraj Tiwari) याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवेत (UPSC Civil Exam) मिळवलेलं यश उत्तम उदाहरण आहे. जेव्हा मनात जिद्द असते तेव्हा समोर अडचणींचा कितीही मोठा डोंगर उभा असला तरी आपण त्यावर मात करु शकतो हे सूरज तिवारीने सिद्ध करुन दाखवलं आहे. दोन पाय आणि एक हात नसतानाही दुसऱ्या हाताच्या तीन बोटांच्या आधारे सूरजने युपीएससी परीक्षा दिली. इतकंच नाही तर त्याने 917 वा रँक मिळवला आहे. 

सूरज तिवारीने ट्रेन अपघातात आपले दोन पाय आणि एक हात गमावला होता. यानंतरही सूरजने हिंमत गमावली नाही. त्याने जिद्दीने युपीएससी परीक्षा दिली आणि 917 वा रँक मिळवला आहे. त्याच्या या यशावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही भुरळ घातली आहे. 

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मैनपुरीमधील दिव्यांग सूरज तिवारीने पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा उत्तीर्ण करत आपण संकल्प केल्यास तो इतर सर्वांपेक्षा जास्त शक्तिशाली असतो हे सिद्ध केलं आहे. सूरजला या ‘सूर्या’सारख्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना”. 

अडचणींपुढे हात टेकणाऱ्या अनेकांसमोर सूरजने एक उदाहरण ठेवलं आहे. कितीही समस्या आल्या तरी प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतं हे त्याने दाखवून दिलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सूरजला दोन पाय आणि एक हात नाही आहे. त्याच्या दुसऱ्या हाताला फक्त तीन बोटं आहेत. पण आपली एकाग्रता, कष्ट आणि जिद्दीने त्याने हे यश खेचून आणलं आहे. 

हेही वाचा :  actor manoj vajpayee actress nina gupta in jaipur literature festival zws 70 | वाजपेयींच्या ‘सत्या’ आठवणी आणि गुप्तांचा ‘सत्य’आग्रह

सूरज युपीएससीच्या परीक्षेसाठी 18 ते 20 तास अभ्यास करायचा. विशेष म्हणजे, सूरजने कोणत्याही कोचिंग किंवा क्लासेसला न जाता स्वत: सर्व अभ्यास केला. सूरज एक मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याचे वडील टेलर आहेत. त्यांचं एक छोटंसं दुकान आहे. वडिलांच्या याच व्यावसयावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. 

2017 मध्ये सूरजचा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात सूरजने आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावला होता. गंभीर जखमी झालेल्या सूरजवर तब्बल 4 महिने उपचार सुरु होते. त्यांच्या घराची आर्थिक स्थिती चांगली नाही. यादरम्यान सूरजच्या एका भावाचा मृत्यू झाला होता. या सर्व संकटांमुळे सूरजचं कुटुंब खचलं होतं. पण सूरजने मात्र आपलं मनोबल कमी होऊ दिलं नाही. त्याने पूर्ण जिद्दीने आणि एकाग्रतेने युपीएससीची तयारी केली. इतकंच नाही तर ती उत्तीर्णही केली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर लोकांचा विश्वास उडून जाईल,’ सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, ‘कसं काय तोंड द्यायचं?’

राज्य शालेय सेवा आयोगाच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेववरील सुनावणीदरम्यान …

‘कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की…’; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक …