Breaking News
  • तुमचा Aadhar Card नंबर कोणाला-कोणाला दिलाय? या डॉक्टरांसारखी चूक तुम्ही तर केली नाहीए ना?
  • Transformation Journey: नवऱ्याने सोडले, नोकरी गेली! मेहनतीच्या जोरावर पटकावला अमेरिकेत सौंदर्याचा किताब
  • Shares : तुम्हाला मोफत बोनस शेअर्स हवे असतील तर ‘हे’ 6 शेअर्स खरेदी करा! – Lets Talk
  • Amravati: शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्रावर तुफान राडा
  • Bank 22 सप्टेंबरपासून होणार बंद; ग्राहकांच्या पैशाचे काय?

कॉफी विथ करण ७ च्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी होणार गौरी खान; पण आर्यनबाबत ठेवली अशी अट

मुंबई: करण जोहर (Karan Johar) याच्या कॉफी विथ करण ७ च्या ग्रँड फिनालेमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची कमतरता भरून काढण्याचं वचन दिलं होतं. काही बातम्यांनुसार शाहरुख त्याचा पठाण सिनेमा रिलीज होईपर्यंत कुणालाही मुलाखत देणार नाही. त्यामुळेच त्यानं करणच्या कार्यक्रमात येण्यास नकार दिला आहे.

शाहरुख नसल्यानं करणनं त्याची बायको गौरी खान हिला (Gauri Khan in Koffee With Karan 7 Grand Finale) बोलावण्याचं ठरवलं आहे. एका न्यूज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, गौरी खान करणला नकार देऊ शकत नाही पण तिच्या काही अटी आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिनं करणसमोर या अटी ठेवल्या आहेत. त्यामध्ये या कार्यक्रमात त्यांचा मुलगा आर्यन खानच्या अटकेबाबत तो काहीही प्रश्न विचारणार नाही ही आहे.

हे वाचा-शॉर्ट ड्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांंसमोर पोहोचलेली अभिनेत्री; ट्रोल झाल्यावर मागितली माफी

अटी मानल्या तरच येणार गौरी

आर्यनसंदर्भात प्रश्न विचारायचे नाहीत तसेच गौरी उत्तर देऊ शकणार नाही अथवा उत्तर देताना तिला अवघड वाटेल असे प्रश्न विचारायचे नाहीत, अशा महत्त्वाच्या अटी गौरीने करणपुढे ठेवल्या आहेत. कॉफी विथ करण ७ च्या ग्रँड फिनालेमध्ये गौरी सुरुवातील एकटीच सहभागी होईल, त्यानंतर भावना पांडे आणि महीप कपूर या स्टार-वाईफ सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. सध्या या तिघीजणी ‘फॅब्युलस लाइव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाइव्ह्ज’मुळे चर्चेत आहेत.

हे वाचा-‘सुशांतसिंह राजपूतचे ब्रह्मास्त्र बॉलिवूडचा करेल विनाश…’, SSR च्या बहिणीचा संताप

करण जोहरची नवीन वेब सीरिज

करण जोहर लवकरच शोटाइम नावाची नवीन वेब सीरिज घेऊन येणार आहे. या सीरिजमधून भारतामधील मनोरंजन विश्वातील काही मोठी रहस्य समोर येणार आहेत. त्याची ही नवीन वेब सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी करण देखील खूपच उत्सुक आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous T-20 World Cup: रविंद्र जडेजाला पर्याय कोण? चिंता नाही, रोहित शर्माला हुकमी एक्का सापडला!

Check Also

‘हे लई अवघड आहे’; पाहा नेमकं कशाविषयी बोलतोय Amey Wagh

मुंबई, 11 सप्टेंबर : ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अमेय …

साप पाहून अमिताभ बच्चन यांच्यासोबत घडते विचित्र गोष्ट, बिग बींनी उघड केलं गुपित

मुंबई, 11 सप्टेंबर : अभिनेते अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. …