मार्च महिन्यात कोणते सिनेमे प्रदर्शित होणार? जाणून घ्या

March Movie Release : सिनेरसिकांसाठी मार्च महिना खूपच खास असणार आहे. या महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेमापासून ते अजय देवगन (Ajay Devgn) ‘भोला’ (Bholaa) या सिनेमापर्यंत अनेक सिनेमे मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar)
कधी प्रदर्शित होणार? 8 मार्च 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi main Makkar) हा सिनेमा येत्या 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

शुभ निकाह (Shubh Nikah)
कधी प्रदर्शित होणार? 10 मार्च

‘शुभ निकाह’ (Shubh Nikah) हा सिनेमा 10 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्क्षा परदासनी, पंकज बेरी, गोविंद नामदेव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दोन वेगळ्या जाती-धर्माच्या मुला-मुलींना लग्नासाठी येणाऱ्या अडचणींवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा भूपेंद्र सिंह संधू ने सांभाळली आहे. 

हेही वाचा :  आशुतोष देशमुख कुटुंबासमोर देणार अरुंधतीवर असलेल्या प्रेमाची कबुली!

मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway)
कधी प्रदर्शित होणार? 17 मार्च

रानी मुखर्जीचा ‘मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ Mrs Chatterjee Vs Norway) हा सिनेमा 17 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशिमा छिब्बरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या सिनेमात रानी आईच्या भूमिकेत दिसणार आहे. 

भीड (Bheed)
कधी प्रदर्शित होणार? 24 मार्च

राजकुमार राव आणि भूमी पेडनेकरचा ‘भीड’ हा सिनेमा 24 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अनुभव सिन्हाने दिग्दर्शित केलेल्या या सिननेमात राजकुमारसह आशुतोष राणादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

भोला (Bholaa)
कधी प्रदर्शित होणार? 29 मार्च 

अजय देवगनचा ‘भोला’ हा सिनेमा 29 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंगावर शहारे आणणारा या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. या सिनेमात तब्बू, संजय मिश्रा आमि मकरंद देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. 

सातरचा सलमान (Satarcha Salman)
कधी प्रदर्शित होणार? 3 मार्च

‘सातारचा सलमान’ हा सिनेमा येत्या 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असल्याने या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. 

हेही वाचा :  विमानतळावरच समंथाचा ‘Halamithi Habibo’ गाण्यावर ठेका! सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!

संबंधित बातम्या

Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, ‘सातारचा सलमान’ चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …