नोकरी शोधताय? कोणत्या महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता अधिक… जाणून घ्या

मार्च-एप्रिल महिन्यात कंपन्यांचे आर्थिक वर्ष संपण्याची घाई असते. कर्मचाऱ्यांचे वार्षिक अप्रेझल होत असते. त्यामुळे कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाण्याच्या प्रक्रियेला देखील या काळात वेग येतो. मात्र असे असले तरी वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत नव्या नोकऱ्यांची किंवा आहे त्या नोकऱ्या बदलण्याची प्रक्रिया सुरूच असते. मात्र कोणत्या महिन्यात नोकऱ्यांची अधिक संधी असते, याचा थोडा अंदाज आला तर तो नोकरी शोधण्याची प्रक्रिया अधिक चांगली करतो. हीच माहिती आपण जाणून घेऊ. कोणत्या महिन्यात मार्केटमध्ये कशी परिस्थिती असते त्यावरून पुढे आलेली ही माहिती आहे…

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
वर्षाच्या सुरुवातीचे हे तीन महिने जॉब शोधण्यासाठी चांगले. वर्षाच्या अखेरपर्यंत बजेट आदीशी संबंधित कामे होऊन जातात. त्यामुळे सॅलरी आणि हायरिंगचे निर्णयही घेऊन झालेले असतात. परिणामी यात तीन महिन्यात जॉब व्हेकन्सी निघते. मार्केटमध्ये प्रोफाइलनुसार जास्त चांगल्या ऑफर्स उपलब्ध होतात.

एप्रिल, मे आणि जून
पहिली नोकरी असो किंवा बेटर प्रॉस्पेक्टसाठी शोधायचा जॉब एप्रिल, मे आणि जून हे वर्षातले बेस्ट महिने आहेत. या महिन्यात सर्वाधिक लोक नोकरी बदलतात. त्यामुळे जवळपास प्रत्येक कंपनीत जॉब व्हेकन्सी निघते. इतकंच नव्हे तर चांगली सॅलरीही ऑफर केली जाते.

दहावीनंतर आर्ट्स, सायन्स की कॉमर्स? कन्फ्यूज असाल तर ‘येथे’ मिळेल तुमचे उत्तर

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
या तीन महिन्यात नोकरी मिळणं खूपच कठीण असतं. जर कुठे नोकरीची संधी असेलही तरी ती तितक्या तोडीची नसते, जितकी ती जानेवारी ते जूनमध्ये असते. कारण या महिन्यात जवळपास सर्वच कंपन्यांची हायरिंग प्रोसेस पूर्ण झालेली असते. शिवाय या तीन महिन्यात खूप कमी लोक नोकरी सोडण्याचा विचार करतात, कारण त्यांना अप्रेजल सायकलचा भाग व्हायचं असतं.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
हा काळ सणासुदीचा असतो. फेस्टिव्ह सीजन. यावेळी लोक आपलं उत्पन्न स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नात असतात, त्यामुळे नोकरी सोडण्याचा विचार करत नाहीत. मात्र एखाद्या कंटेंट जनरेट करणाऱ्या कंपनीत नक्की या काळात नोकरीच्या संधी असतात.

Abroad शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…
Writing Tips: टायपिंगच्या युगात लिहिण्याचा सराव सुटलाय? या टीप्सने करा कमबॅक

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Part Time PhD: आता पार्ट टाइम पीएचडी करणे शक्य, आवश्यक कागदपत्रांची माहिती करुन घ्या

Part Time PhD: विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (university grants commission) आयआयटीची प्रणाली अंगीकारली जाण्याची शक्यता आहे. …

Territorial Army मध्ये ऑफिसर बनण्याची संधी, पात्रता आणि पगार जाणून घ्या

Territorial Army Recruitment 2022: प्रादेशिक सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. यासाठी …