कसा आहे शेहजादा? नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू

 Shehzada Twitter Review:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘शेहजादा’ (Shehzada) आज चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पठाण या चित्रपटाबरोबर टक्कर झाली आहे. पठाण हा चित्रपट गेले 23 दिवस बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता कार्तिकचा शेहजादा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? या प्रश्नांचे उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल. अनेकांना शेहजादा या चित्रपटाचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहिला. आता नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

कसा आहे शेहजादा? 
अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेहजादा या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. एका नेटकऱ्यानं ट्विटरवर कार्तिकच्या या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मी ऑस्ट्रेलियामध्ये शेहजादा पाहिला. सॉलिड एंटरटेनर चित्रपट आहे. कार्तिक आर्यननं चांगलं काम केलं आहे. क्रिती ग्लॅमरस दिसली आहे. तर परेश रावल यांनी देखील चांगलं काम केलं आहे. ‘ या नेटकऱ्यानं शेहजादा या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत. 

दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘अॅव्हरेज चित्रपट आहे. टाईमपास आहे. कार्तिक आर्यननं ओव्हर अॅक्टिंग कमी केली आहे. क्रितीनं एकदम मस्त काम केलं आहे.’

शेहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon)  यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा :  गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा संपन्न; पाहा विजेत्यांची यादी

महत्वाच्या इतर बातम्या : 

‘पठाण’ नंतर आता ‘शेहजादा’ झळकला बुर्ज खलिफावर ; कार्तिक आर्यनकडून खास व्हिडीओ शेअर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …