‘शेहजादा’ झळकला बुर्ज खलिफावर ; कार्तिक आर्यनकडून खास व्हिडीओ शेअर

Shehzada Movie: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)  हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता त्याचा शेहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता शेहजादा या चित्रपटाचा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला आहे. नुकतीच कार्तिकनं एक खास व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली.

कार्तिकनं शेअर केला व्हिडीओ

कार्तिकनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो दुबईमध्ये गेलेला दिसत आहे. कार्तिकला पाहण्यासाठी दुबईमधील चाहत्यांनी गर्दी केली होती, असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुबईमधील बुर्ज खलिफावर कार्तिकच्या शेहजादा या चित्रपटाचा ट्रेलर झळकला. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, ‘मला शेहजादा झाल्यासारखं वाटतं आहे. टॉप ऑफ द वर्ल्ड’ व्हिडीओमध्ये कार्तिक हा बुर्ज खलिफासमोर फाऊंटन शो पाहताना देखील दिसत आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेकांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ: 


शेहजादा या चित्रपटाच्या आधी शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर देखील बुर्ज खलिफावर झळकला होता. पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता शेहजादा या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर देखील लवकरच कार्तिकच्या चाहत्यांना मिळेल. 

हेही वाचा :  Happy Birthday Juhi Chawla : जाणून घ्या सुपरस्टार जुही चावलाच्या खास गोष्टी...

शेहजादा चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

शेहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी  2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon)  यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शेहजादा हा चित्रपट अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाचा रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे. 2020 मध्ये अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरमलो’  हा चित्रपट रिलीज झाला होता. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Shehzada Title Track Releases: ‘मैं जो आ गया…’; कार्तिक आणि क्रितीच्या ‘शेहजादा’मधील गाणं रिलीज



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …