iPhone 15 ची चाहूल लागल्याने iPhone 14, 13, 12 वर घसघशीत सूट; पाहा Final Price

Apple iphone 15 launch iphone 14 Price Slash: जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी याच महिन्यामध्ये आयफोन 15 भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने यासंदर्भातील तारखेची घोषणा करताना 12 सप्टेंबर रोजी हा फोन लॉन्च केला जाईल असं स्पष्ट केलं आहे. मात्र आयफोन 15 लॉन्च होण्याआधीच फ्लिपकार्टवर आयफोन 14, आयफोन 13 आणि आयफोन 12 वर घसघशीत सूट दिली जात आहे. त्यामुळेच आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठीही सुवर्णसंधी आहे. मोठी सूट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा लाभही घेता येणार असल्याने अगदी परवडणाऱ्या किंमतीत आयफोनचं स्वप्न साकारता येणार आहे. या आयफोनवर मिळत असलेली सूट आणि नेमके हे फोन किती रुपयांना उपलब्ध आहेत पाहूयात…

आयफोन 14

आयफोन 14 चं 128 जीबी व्हेरिएट फ्लिपकार्टवर 69 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. बँकेच्या ऑफरचा विचार केल्यास एचडीएफसीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डवर ईएमआय पर्यायासहीत फोन घेतल्यास 4 हजारांची अतिरिक्त सूट मिळेल. त्यामुळे हा फोन 62 हजार 999 रुपयांना विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सेस बँक कार्डावर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरअंतर्गत 2 ते 3 हजारांपासून अगदी 50 हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. हा फोन 2 हजार 792 रुपयांच्या EMI मध्ये विकत घेता येईल.

हेही वाचा :  iPhone 15 साठी हाणामारी; ग्राहकाने दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारले

आयफोन 13

आयफोन 13 चं 128 जीबीचं व्हेरिएट या वेबसाईटवर 58 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवरही एचडीएफसीच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ईएमआयसहीत फोन घेतल्यास 2 हजार रुपयांची सूट मिळेल. यामुळे हा फोन 56 हजार 999 रुपयांना विकत घेता येईल. एक्सचेंज ऑफरअंतर्गत 2 ते 3 हजारांपासून अगदी 50 हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. हा फोन 2 हजार 459 रुपयांच्या EMI मध्ये विकत घेता येईल.

आयफोन 12

128 जीबी स्टोरेज असलेलं आयफोन 12 चं व्हेरिएट या वेबसाईटवर 50 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर एचडीएफसीच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ईएमआयसहीत फोन घेतल्यास 2 हजार रुपयांची सूट मिळेल. यामुळे हा फोन 48 हजार 999 रुपयांना विकत घेता येईल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सेस बँक कार्डावर 5 टक्के कॅशबॅक ऑफर या फोनवरही उपलब्ध आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये 2 ते 3 हजारांपासून 50 हजारांपर्यंतची सूट यावर मिळू शकते. हा फोन 2 हजार 459 रुपयांच्या ईएमआयवर विकत घेता येईल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …