iPhone 15 साठी हाणामारी; ग्राहकाने दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारले

iPhone 15 : आयफोन  15 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. परराज्यातले नागरिक मुंबईत खरेदीसाठी दाखल झाले आहेत. तर, दिल्लीतही आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. दिल्लीतही आयफोन खरेदीसाठी ग्राहकांचा गोंधळ पहायला मिळाला. दिल्लीत iPhone 15 साठी हाणामारी झाली आहे, एका   ग्राहकाने दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारले आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 

काय घडलं नेमकं?

सोशल मिडियावर व्हायरल होत असेलला व्हिडिओ हा एका मोबाईल शॉपीमधील आहे. दिल्लीतील कमला नगर भागात हे मोबाईलचे शोरुम आहे. या दुकानात आयाफोनची विक्री करण्यात येत आहे. एका ग्राहकाने येथे आयफोन 15 बुक केला होता. मात्र, आयफोन 15 ची डिलीव्हरी मिळण्यासाठी उशीर झाला. यामुळे हा ग्राहक खूपच चिडला. रागाच्या भरात ग्राहकाने शो रुममध्ये गोंधळ घातला. या ग्राहकाने थेट दुकानातील सेल्समनसोबत गोंधळ घालण्यासा सुरुवात केली. संतापाच्या भरात या ग्राहकाने दुकानातील सेल्समनला मारहाण करण्यास सुरुवात केली. या ग्राहकाने शो रुममधील सेल्समनला कपडे फटेपर्यंत मारहण केली. संतप्त ग्राहकांनी शो रुम मधील वस्तूंचे नुसकानही केल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. 

हेही वाचा :  G-20 साठी जगभरातील दिग्गज भारतात, सर्वसामान्यांना याचा काय फायदा? जाणून घ्या

22 सप्टेंबरपासून आयफोन- 15 सिरीजची विक्री सुरु

22 सप्टेंबरपासून भारतात अॅपलच्या आयफोन- 15 सिरीजची विक्री सुरु झाली आहे. अॅपलच्या ऑफिशिअल वेबसाईट तसंच ईकॉमर्स वेबसाईटवर आयफोन- 15 उपलब्ध आहे. भारतात आयफोनची किंमत  79,900 रुपये आहे तर सर्वात महागडा प्रो-मॅक्स आयफोन- 15 हा 1 लाख 59 हजार 900 रुपयांचा आहे. मुंबईत तर आयफोन खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

 

12 सप्टेंबरला लाँच झाली आयफोन- 15 सिरीज

आयफोन- 15 सिरीज  12 सप्टेंबरला लाँच झाली. apple event मध्ये आयफोन- 15 सिरीज लाँच करण्यात आली. आयफोन 15 सीरिजमधले 4 मॉडेल्स लॉन्च करण्यात आले आहेत. आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स असे हे मॉडेल आहेत.

हेही वाचा :  Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का

नव्या आयफोनमध्ये USB सी टाईप पद्धतीच्या चार्जिंगचा समावेश 

आयफोनने या फोनमध्ये सर्वात मोठा बदल केलाय. तो म्हणजे नव्या आयफोनमध्ये USB सी टाईप पद्धतीच्या चार्जिंगचा समावेश केलाय  तेव्हा आता कोणत्याही सी टाईप चार्जिंग केबलने  आणि चार्जरने आयफोन चार्ज करणं शक्य होणार आहे. आयफोन आणि ANDROID मधला मोठा फरक आता संपुष्टात आला आहे. आयफोन 15मध्ये कॉलदरम्यान नॉइज कॅन्सलेशन शक्य आहे. तुम्ही कोणत्याही गर्दीत असाल आणि तिथे कितीही गोंगाट असला तरी तो कॉलवर असताना ऐकू येणार नाही. त्यासाठी dynamic island फीचर्सचा समावेश करण्यात आलाय. एका छोट्या आकाराचा नॉच त्यासाठी देण्यात आलाय. हे फिचर गेल्यावर्षी आयफोन 14 प्रो सीरिजमध्ये देण्यात आलं होतं. iPhone 15 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, ज्याने डिटेल्समध्ये फोटो क्लिक करता येतील.
 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …