मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस; चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल

Urfi Javed: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री  उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई (Mumbai) पोलिसांनी दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. 

उर्फी जावेदच्या अडचणीव वाढ होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. 

चित्रा वाघ या देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उर्फीच्या फॅशनवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं होतं, ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.’ 

हेही वाचा :  Usha Mangeshkar Birthday : शेकडो सुमधुर गाणी गाणाऱ्या उषा मंगेशकर!

news reels

चित्रा वाघ यांनी एका ट्वीटमध्ये लिहिलं होतं, ‘तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतीचा शिकार होतात.  तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’  या ट्वीटला उर्फी जावेदनं रिप्लाय दिला होता. उर्फी ट्वीटमध्ये लिहिलं होतं, ‘तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. तुम्हाला माझ्याबद्दल बोलून जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे आहे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिलांचे शिक्षण, प्रलंबित असलेली बलात्काराची प्रकरणे, याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?’ 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Urfi Javed: ‘मी पण भाजपमध्ये प्रवेश करते, मग…’; उर्फीनं पुन्हा साधला चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …