Infinix Note भारतात लाँच, १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय 5G फोन

Infinix Note 30 5G : चांगला मोबाइल घ्यायचाय पण १५ हजारपेक्षा कमी बजेट आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. Infinix ने भारतात एक बजेट 5G स्मार्टफोन आणला आहे. हा फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारपेठेत दाखल झाला. त्यानंतर हा फोन भारतात कधी येणार? याबाबत उत्सुकता लागली होती. आता याची प्रतीक्षा संपली असून अखेर इन्फिनिक्स भारतात लॉंच करण्यात आला आहे. या फोनमध्ये पंच होल कटआउट, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि जेबीएल इन-बिल्ट ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत. विशेष म्हणजे या फोनची किंमत १५ हजारांपेक्षा कमी आहे.  Infinix Note 30 5G ची किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Infinix Note 30 5G च्या 4GB + 128GB मॉडेलसाठी तुम्हाला १४ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत १५ हजार ९९९ रुपये इतकी आहे.  Axis Bank क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १ हजारची तात्काळ सवलत मिळणार आहे. हा फोन ब्लॅक, ऑरेंज आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये येतो. २२ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट ऑनलाइनद्वारे हा फोन तुम्हाला घेता येईल.

हेही वाचा :  Google वर सर्च करून पाहा 'हे' शब्द; स्क्रीनवर जे काही दिसेल ते पाहून हैराण व्हाल

Infinix Note 30 5G तपशील

Infinix Note 30 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे.

यासोबतच सेल्फी स्नॅपरसाठी पंच-होल कटआउट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. 

फोनची मीडियाटेक डायमेंसीटी 6080 SoC आहे. तसेच 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS3.1 स्टोरेज आहे.

फोनमध्ये 8जीबी अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम सपोर्ट असल्याने तुम्हाला मल्टीटास्किंगचा चांगला अनुभव मिळू शकणार आहे. 

Infinix Note 30 5G कॅमेरा आणि बॅटरी

Infinix फोनच्या मागील बाजूस 108MP प्राथमिक कॅमेरा, 2MP डेप्थ युनिट आणि AI लेन्ससह तिहेरी कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी, समोर एक 16MP शूटर आहे. यामुळे तुम्हाला स्पष्ट आणि तपशीलवार सेल्फी काढण्यात मदत मिळेल. 

5,000mAh ची बॅटरी आणि 45W जलद चार्जिंग सपोर्टमुळे तुम्हाला फोन जास्त तास वापरता येईल. यासह, कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.1, GPS/ GLONASS आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …