आधी सासरा मग दीर, नवऱ्याच्या मानसिक स्थितिचा फायदा घेत करायचे अत्याचार, घरातला क्रूरपणा जगासमोर

Basti Crime: जोडीदाराची साथ नसेल तर एकट्या महिलेला समाजाशी लढणे खूप कठीण जाते. त्यातही तिच्यावर 
तीन मुलींची जबाबदारी असेल तर प्रसंग आणखीनच कठीण येताय. एका दुर्देवी महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. जिला घरातच लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागला. नवऱ्याच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन आधी सासरा मग दीराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पीडित महिलेने सासरच्या मंडळींचा क्रूरपणा जगासमोर आणला आहे. रुधौली पोलीस ठाण्यात यासंदर्भात महिलेचा सासरा आणि दीराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेसमोर तीन मुलींच्या संगोपनासह समाजाशी लढण्याचे आव्हान आहे.  महिलेचा विवाह गतिमंद व्यक्तीशी नऊ वर्षांपूर्वी लावून देण्यात आला होता.

पीडितेने सासरच्यांचा क्रूरपणा केला उघड

मुलाच्या मानसिक दुर्बलतेचा सासरा आणि दीराने फायदा घेत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने सकेला आहे. सासरच्यांनी अनेकवेळा धमकावून तिचे लैंगिक शोषण केले. सहन करण्याच्या पलिकडे गेल्यानंतर सासरच्या मंडळींविरोधात तिने तक्रार केली. पण सासऱ्याच्या कुकर्माची माहिती पोलिसांनी ऐकून घेतली नाही. त्यानंतरही सासरा सुनेला वासनेची शिकार बनवतच राहिला. वैतागून पीडितेने एके दिवशी सासऱ्याचे कृत्य व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले.

हेही वाचा :  धक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप

काळे सत्य समोर आल्यानंतर पोलिसांना सासरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणे भाग पडले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सासरा लॉकअपमध्ये गेला. दुसरीकडे दीराची वाईट नजर वहिनीवर पडली. त्याने वहिनीला वारंवार आपल्या वासनेचा शिकार बनवले. पीडित महिलेच्या अडचणी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर नुकतेच सासू, वहिनी, भावजयी यांनी महिलेला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.विरोध केल्याने तिघांनीही महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुधौली पोलिसांनी उलट पीडितेविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

डीएनए चाचणीच्या अहवालात सासरा मोठ्या मुलीचा बाप

पीडित महिलेच्या मोठ्या मुलीची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. डीएनए चाचणीच्या अहवालात मुलीचे वडील दुसरे कोणी नसून आजोबा असल्याचे समोर आले आहे. आता विवाहित पीडित महिलेचे जीवन नरकमय झाले आहे. मानसिक अस्थिर असलेला पती पत्नीला मदत करु शकत नाही.

सासू-सासरे हे पीडितेच्या जीवाचे शत्रू झाले आहेत. अशा स्थितीत महिलेने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? असा प्रश्न उभा राहतो. आता पीडित महिला तीन मुलींसह घरोघरी भटकत आहे.

पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन 

पीडित महिलेने पाठवलेल्या व्हिडिओच्या आधारे कारवाई केली जाईल, असे एएसपी दीपेंद्र चौधरी यांनी सांगितले. पीडित महिलेच्या वतीने अर्ज देण्यात आला आहे. महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओही आमच्या निदर्शनास आला आहे. याप्रकरणी पोलिस निश्चितपणे कायदेशीर कारवाई करतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :  लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पत्नीला धक्का, पतीने पॉर्नस्टारसारखे कपडे घालायला लावले अन् नंतर...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …