भारताचे 299 वे अब्जाधिश व 63200 कोटीचे मालक केपी सिंह वयाच्या 91 व्या वर्षी प्रेमात, रोमहर्षक लवस्टोरी

“ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन..!” जगजीत सिंग यांच्या प्रसिद्ध गझलमधील या मन मोहून घेणा-या सुंदर ओळी DLF ग्रुप के एमेरिटस चेयरमन कुशाल पाल सिंह अर्थात KP Singh यांना तंतोतंत जुळतात. म्हणतात प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ते कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकतं आणि ही गोष्ट खरी सुद्धा आहे. आपण अशी अनेक उदाहरणे पहिली आहेत जेव्हा अनेकांनी उतारवयात लग्न केले किंवा नव्याने आपले रिलेशनशिप जगजाहीर केले. आता अशाच लोकांच्या यादीत अजून एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे DLF ग्रुप के एमेरिटस चेयरमम केपी सिंह यांचे! केपी सिंह यांचे वय आहे 91 वर्ष आहे आणि या वयात त्यांना पुन्हा एकदा प्रेम गवसले आहे.

हो मंडळी, ते पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत आणि त्यांनी पुन्हा सिद्ध केले की प्रेमाला वयाचे कोणतेही बंधन नसते. केपी सिंह यांच्या या नवीन लाईफ पार्टनरचे नाव आहे शीना आणि तिच्यासोबत आयुष्यातील उरली सुरली वर्षे काढण्याचा केपी सिंह यांचा मानस आहे. ज्या वयात अनेक लोक हार मानून व दुखणी-खुपनी घेऊन रडत बसतात त्या वयात केपी सिंह यांनी केलेली नव्या आयुष्याची सुरूवात खरंच खचलेल्या मनांना प्रेरणा देणारी आहे. दु:खावर पाय ठेवल्याशिवाय सुखाचा पर्वत पाहता येत नाही हे त्यांच्या या निर्णयावरून दिसून येते. जाणून घेऊया त्यांची रोमहर्षक प्रेम व जीवनकहाणी..! (फोटो सौजन्य :- Twitter – Deepak Sharma #SaveSoil, Financial Express, Thiruvasagam, emailtheboss, Bloomberg Wealth, Business Today)

हेही वाचा :  DLF KP Singh: 63,200 कोटींचा मालक असलेला भारतीय उद्योजक वयाच्या 91 व्या वर्षी पुन्हा पडला प्रेमात

केपी सिंह आहेत गडगंज श्रीमंत

केपी सिंह आहेत गडगंज श्रीमंत

डीएलएफ ग्रुप रिअल इस्टेटमध्ये सक्रीय असून केपी सिंह हे रिअल इस्टेटमधील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये केपी सिंग 299 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $7.63 अब्ज (सुमारे 63200 कोटी रुपये) आहे. माहिती अशी आहे की, त्यांनी 1961 मध्ये सैन्यातील पोस्टिंग सोडले आणि त्यांचे सासरे राघवेंद्र सिंग यांनी सुरू केलेल्या दिल्ली लँड अँड फायनान्स (DLF) कंपनीमध्ये ते सामील झाले. ते पाच दशकांहून अधिक काळ कंपनीचे अध्यक्ष राहिले आणि जून 2020 मध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता ते डीएलएफचे एमेरिटसचे चेअरमन आहेत.

(वाचा :- प्रियकर व प्रेयसीलाच मानून बसलाय नवरा-बायको? हे 5 संकेत सांगतात तुमचा बाबू-शोना करणार नाही तुमच्याशी कधीच लग्न)

केपी सिंह यांच्या पत्नीने घेतले होते वचन

केपी सिंह यांच्या पत्नीने घेतले होते वचन

केपी सिंह हे रिअल इस्टेटमधील अव्वल श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत. केपी सिंह यांच्या पत्नी इंदिरा यांचे 2018 मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. एका मुलाखतीत केपी सिंह यांनी सांगितले की, “माझ्या पत्नीने तिच्या मृत्यूच्या ६ महिने आधी माझ्याकडून वचन घेतले होते की मी हार मानू नये. माझ्यापुढे अजून आयुष्य आहे आणि तिचे हेच शब्द मला जगण्याची प्रेरणा देत आहेत.” ते पुढे म्हणाले की, माझे वैवाहिक जीवन खूप छान होते. माझी पत्नी केवळ माझी जोडीदारच नव्हती तर माझी मैत्रीणही होती. तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. 65 वर्षे एकत्र राहून जेव्हा तुम्ही तुमचा जोडीदार गमावता, तेव्हा होणारी वेदना शब्दात मांडता येत नाही. तुमचे संपूर्ण आयुष्य बदलते.” पत्नीच्या मृत्यूनंतर केपी सिंह नैराश्यात होते.
(वाचा :- नव-याने या एका गोष्टीवर 3 वर्षात तब्बल एक करोड रूपये उधळले,त्यामागील किळसवाणं सत्य मी सासू-सास-यांपासून लपवलंय)​

हेही वाचा :  Sharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्यक्त केल्या नव्या जोडीदाराबाबतच्या भावना

व्यक्त केल्या नव्या जोडीदाराबाबतच्या भावना

डीएलएफ ग्रुपचे चेअरमन एमेरिटस आपल्या नवीन नात्याबद्दल म्हणाले, “मी खूप भाग्यवान आहे की मला एक नवीन जोडीदार मिळाला आहे. तिचे नाव शीना आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक आहे. ती उत्साही आहे आणि मला प्रेरणा देते. शीना मला प्रत्येक गोष्टीत साथ देते. तिने मला जगण्याची आणि आनंदाने राहण्याची प्रेरणा दिली आणि आता ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.”
(वाचा :- कपिल शर्मासारखा प्रसिद्ध कॉमेडियन का वळलाय या मार्गाला,जगाला हसवणारा व्यक्तीच का आणतोय बायकोच्या डोळ्यांत पाणी)​

जोडीदार सोडून जाण्याचे दु:ख असते मोठे

जोडीदार सोडून जाण्याचे दु:ख असते मोठे

मृत्यू हा अटळ आहे. जाणारा व्यक्ती हा जातो पण सगळ्यात जास्त त्रास हा त्याच्या मागे राहिलेल्या जोडीदाराला होतो. जोडीदार कायमचे सोडून जाण्याचे दु:ख खूप मोठे असते व ते केवळ त्या व्यक्तीलाच ती पोकळी समजू शकते. खास करून जेव्हा विवाहित जोडप्यांना अनेक वर्षे संसारात रमल्यानंतर अशा दु:खाला सामोरे जावे लागते तेव्हा त्यांचासाठी आयुष्य तितके सोप्पे राहत नाही. केपी सिंह यांच्याबाबतीत देखील होच गोष्ट झाली. कितीही मनाची तयारी असली तरीही 65 वर्षांच्या संसारानंतर एकट्याने आयुष्य जगायचं आहे ही कल्पना करणंही जीवघेणं ्असतं.
(वाचा :- 4 वर्ष प्रेमात आहे, सेटल आहे पण 35 पर्यंत लग्न करायचं नाही पण प्रेयसीची विचित्र अट ऐकून पायाखालची जमीन सरकलीये)​

हेही वाचा :  मेंदूच्या जीवघेण्या आजाराची अमेरिकेत दहशत! कोरोनाच्या धक्कादायक Side Effect चा खुलासा

सर्वांना आहे प्रेम करण्याचा अधिकार

सर्वांना आहे प्रेम करण्याचा अधिकार

अनेकांनी ही बातमी बाहेर येताच केपी सिंह यांची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले गेले. पण ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण त्यांनी ज्या भावनेतून आपले रिलेशनशिप जाहीर केले आहे ती भावना समजून घ्यायला हवी. हे असे वय आहे ज्या वयात खऱ्या अर्थाने व्यक्तीला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. पण आता पत्नी सोडून गेल्याने ते एकटे पडले आहेत. अशावेळी जर त्यांना पत्नीसारखी काळजी घेणारी एखादी जोडीदार मिळाली असेल तर त्यात वावगे काही नाही. कोणत्याही सुजाण व्यक्तीला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम करण्याचा अधिकार नक्कीच आहे. प्रेम हे वय, रंग-रूप पाहून केले जात नाही, ज्या व्यक्तीच्या हातात हात दिल्यानंतर आपल्याला निश्चिंत वाटतं तेच आपलं खरं प्रेम..! हे सिद्ध करण्यासाठी जगाची पर्वा न करणा-या धाडसी केपी सिंह यांचं करावं तेवढं कौतुक कमीच.
(वाचा :- ‘मी दिया मिर्झा शपथ घेते’ ओठांवर ओठ टेकून प्रेम व्यक्त करत मराठमोळ्या शब्दांत पतीचा स्वीकार,चाहत्यांकडून कौतुक)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …