Sharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sharad Pawar On Supreme Court verdict : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी देशातील सर्व विरोधकांच्या वज्रमुठीवर भाष्य केलंय. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं. 

काय म्हणाले शरद पवार?

लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. विरोधकांची मोळी बांधण्याची गरज आहे. महाराष्ट्रात देखील एकत्र काम करण्याची गरज आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यावर चर्चेची गरज नाही, आत्ता चर्चा नको, असंही शरद पवार म्हणाले आहे.

अध्यक्षांनी नियमांच्या चौकटीत राहून काम करायचं असतं. ठाकरेंच्या राजीनाम्याविषयी मी पुस्तकात लिहिलं आहे. मी पुस्तकात आपलं मत मांडल्याने काही मित्र नाराज झाले, असं म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यानंतर त्यांनी भाजपकडे मोर्चा वळवला.

हेही वाचा :  स्वबळावर लढण्याची ताकद आहे की नाही? उद्धव ठाकरे राज्यभर फिरुन चाचपणी करणार

नैतिकता आणि भाजप यांचा काही संबंध आहे, असं मला वाटत नाही, असं रोखठोक वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं आहे. महाविकास आघाडी अधिक जोमानं काम करणार. राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती. राज्यकर्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र भूमिका बांधली, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

ईडीच्या नोटीसवर पवार म्हणतात…

जयंत पाटलांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेचा सात्त्याने गैरवापर केला जात आहे, असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माझा महाराष्ट्र दौरा सुरूच राहिल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

नितीश कुमार काय म्हणाले?

भाजप जे करतंय ते देशहिताचं नाही. शरद पवार विरोधकांचा चेहरा झाले तर आनंदच आहे. कर्नाटकात सेक्युलर सरकार येईल, असं नितिश कुमार यावेळी म्हणाले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …