भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका संपल्यावर आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते ट्वेन्टी-२० मालिकेचे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.या मालिकेतील पहिला सामना २९ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याचा टॉस हा संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने सामना सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना रात्री ८.०० वाजता सुरु होणार आहे. वनडे सामन्यांपेक्षा हे ट्वेन्टी-२० सामना एक तास उशिराने सुरु होणार आहेत. हे ट्वेन्टी-२० सामने रात्री ८.०० ते १२.०० या कालावधीत होतील, असे म्हटले जात आहे. पण जर पावसाने खोडा घातला तर हे सामने उशिरा संपू शकतात. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडेमध्ये पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे हा सामना उशिरा संपला होता. पावसामुळे या सामन्यात डकवर्थ लुईस नियम वापरण्यात आला होता. भारताने या सामन्यासह मालिकाही जिंकली आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेवर सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
वाचा- श्रीलंकेतील आशिया क्रिकेट चषक आता कोणत्या देशामध्ये खेळवण्यात येणार, जाणून घ्या…
भारताचा संभाव्य संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
वाचा-भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का! नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर; कारण समोर
टी-२० मालिका-
२९ जुलै- पहिली टी २०
०१ ऑगस्ट- दुसरी टी २०
०२ ऑगस्ट- तिसरी टी २०
०६ ऑगस्ट- चौथी टी २०
०७ ऑगस्ट- पाचवी टी २०
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या