बसून किंवा उभं राहून नाही तर ‘या’ पद्धतीने औषधं घेणं फायद्याचं, नवीन अभ्यासात महत्वाचा खुलासा

खूप ताप असो, वेदना असो किंवा इतर कोणतीही समस्या असो, आपण असह्य झाल्यावर पहिला विचार औषधांचा करतो. अनेकदा डॉक्टर औषध दिल्यानंतर फॉलोअपसाठीही बोलावतात. त्यानंतर पुढील औषधाची गरज आहे की नाही हे ठरविले जाते. ही औषधे घेत असताना तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्ही ज्या पद्धतीने औषध घेत आहात ते योग्य आहे का? सरळ हाच प्रकार आहे की, तुम्ही औषध पाण्यात किंवा दुधासह घेतले जाते. औषध पोटात पोहोचताच अवघ्या काही वेळातच परिणाम सुरू होतो.

या जुन्या आणि पारंपारिक पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही औषध अधिक प्रभावी बनवू शकता. ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या तब्बेतीवर होऊ शकतो. अलीकडे काही नवीन अभ्यास झाले आहेत. ज्यामध्ये औषध घेण्याची पद्धत सांगितली आहे. यासोबतच असाही दावा करण्यात आला आहे की, अशा प्रकारे औषध खाल्ल्यास औषधाचा परिणाम चांगला होतो.

​औषध घेण्याची योग्य पद्धत

औषध पडून म्हणजे झोपून घ्यावे, बसून घ्यावे की उभे असताना घ्यावे. फिजिक्स ऑफ फ्लुइड्सच्या अभ्यासात यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अभ्यासानुसार, जे लोक झोपून औषध खातात. त्यांच्यावर औषधाचा परिणाम लवकर होतो. अभ्यासात उजव्या हाताच्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला झोपण्याचा आणि नंतर औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा :  धक्कादायक! Live Stream करत चिनी व्होडकाच्या 7 बाटल्या संपवणाऱ्या सोशल मीडिया स्टारचा मृत्यू

(वाचा – Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान)

​औषधे घेताना काय काळजी घ्यावी

आम्लपित्तासारख्या समस्या असल्यास डाव्या बाजूला झोपण्याचा सल्ला दिला जातो. कारण अन्नाची नळी वरच्या बाजूला असते आणि पोट तळाशी असते. यामुळे, ऍसिड वरच्या दिशेने उलटू शकत नाही. औषध घेत असताना, उजव्या हाताच्या बाजूला झोपण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, उजव्या बाजूला झोपून औषध घेतल्याने ते औषध रक्तात लवकर आणि सहज मिसळते. हे गुरुत्वाकर्षणाशी देखील संबंधित आहे.

(वाचा – Food For Constipation: जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील)

​उभ्याने औषध घेताना

याशिवाय उभे राहून औषध खाल्ल्यास थोडेसे मागे वाकून औषध खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या अभ्यासाशिवाय न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननेही काही काळापूर्वी औषध घेण्याची योग्य पद्धत सांगितली होती. या अभ्यासानुसार औषध घेताना चार नियम पाळणे आवश्यक आहे.

(वाचा – Causes of Belly Fat: दररोज पोटावरची चरबी वाढतेय, शर्टच्या बटनातून ढेरी डोकावतेय? तुमच्या ७ चुकाच याला कारणीभूत)

हेही वाचा :  Job Offer : माला'माल' करणारी Job ऑफर; दोन झुरर्के मारा आणि 88 लाख पगार मिळवा

​योग्यवेळी घ्या औषधे

औषध घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे. अभ्यासानुसार डॉक्टरांनी ज्या पद्धतीने औषध खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यात काहीही बदल करण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा. जर औषध सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे असेल तर ती वेळ योग्य आहे. ज्या वेळेसाठी औषध घेण्यास सांगितले आहे ते काटेकोरपणे पाळले पाहिजे.

(वाचा – Juice For Weight Loss : लठ्ठपणामुळे सगळीकडून लोंबकळते चरबी, या ५ ज्यूसने झपाट्याने कमी होईल वजन))

​औषध मध्येच घेणे न सोडणे

औषधे घेतानाच मध्ये सोडणे ही अजिबातच योग्य गोष्ट नाही. उदाहरणार्थ, डॉक्टरांनी तुम्हाला पाच दिवस औषध दिले आहे, परंतु तीन दिवसांत बरे झाल्यानंतर तुम्ही औषध बंद केले. ही एक मोठी चूक आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोस घ्यावा.)

(वाचा – Kindey Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

​स्टोर करण्याची योग्य पद्धत

औषध कसे साठवावे? हे प्रत्येक औषधाच्या पानावर किंवा कुपीवर देखील लिहिलेले असते. ती पद्धतही कोणताही बदल न करता अवलंबली पाहिजे. प्रत्येक औषध फ्रीजमध्ये ठेवायचे नसते. तसेच प्रत्येक औषध उघड्यावर ठेवता येत नाही. ते जसे लिहिले आहे तसे साठवा.

हेही वाचा :  कॅनडामध्ये Most Wanted खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या; 2017 पासून होता फरार

(वाचा – Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …