फ्रिजमध्ये चुकूनही ठेऊ नका हे 4 पदार्थ, विषारी बनून पोट व आतड्यांना टाकतात जाळून

शिजवलेले अन्न आणि खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. फ्रीजमुळे हे पदार्थ ताजे राहण्यास मदत होते. पण फ्रीजमध्ये अन्न ठेवताना खूप काळजी घेतली पाहिजे. कारण, काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब होतात आणि शरीरात टॉक्सिन तयार होतात. अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अशा 4 खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे, जे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

यामागचे कारणही त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे. फार कमी लोकांना याबद्दल माहित आहे. म्हणुनच आम्ही हा खास लेख आज तुमच्यासाठी आणला आहे, जेणेकरून तुम्ही तो वाचून चुका करणार नाही. चला जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ आणि फ्रीज मध्ये हे पदार्थ का ठेवू नयेत!

कांदा होतो खराब

कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. कारण असे केल्याने कांदा आपला ओलावा गमावतो आणि बुरशीला बळी पडतो. म्हणून कांदे प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू नयेत तसेच ते बटाट्यांसोबत सुद्धा कधीच ठेव नयेत! अनेक लोकांना ही गोष्ट माहीतच नसल्यने ते चुका करतात आणि खूप सारे कांदे आणून फ्रीज मध्ये ठेवतात व पुढे त्याचे काय परिणाम होतात हे आताच तुम्हाला कळले. त्यामुळे तुम्ही अशी कोणती चूक करत असाल तर ती आताच थांबवा.

हेही वाचा :  Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा

(वाचा :- Immunity Booster : शरीर आतून पोखरून टाकतोय Corona व थंडीचा प्रकोप, वाचण्यासाठी या 5 पद्धतींनी वाढवा इम्युनिटी)

लसणावर सुद्धा ठेवा लक्ष

कांद्याप्रमाणे लसूण देखील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. यामुळे लसूण आतून रबरासारखे बनते. लसूण आणि कांदे नेहमी कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवावेत. अनेक घरात बाजारातून लसूण आणल्या आणल्या ती फ्रीज मध्ये ठेवली जाते. अशी चूक करून आपण लसणाची क्वालिटी कमी करतो. अनेकांना हा गैरसमज असतो की लसूण यामुळे फ्रेश राहतील. परंतु अपुऱ्या ज्ञानामुळे त्यांच्याकडून चूक होते आणि लसूण खराब होतात.

(वाचा :- रोज खाल्ल्या जाणा-या या 1 पदार्थात ठासून भरलंय रक्ताच्या नसा ब्लॉक करणारं कोलेस्ट्रॉल, यामुळेच येतो हार्ट अटॅक)

टोमॅटो सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नये

बहुतेक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात. पण असे केल्याने त्यांची चव, फ्लेवर आणि रस नष्ट होतो. या एका चुकीमुळे टोमॅटो मधील पोषक घटक सुद्धा नष्ट होतात. टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते रूम टेम्परेचर मध्येच ठेवावेत. जाणकार सुद्धा सांगतात की तुम्हाला जर वाटते की तुम्ही आणलेले टोमॅटो जास्त काळ टिकावेत तर ते उघड्यावरच ठेवावेत. उघड्यावर ठेवलेले टोमॅटो आहे तसेच राहतात व जास्त काळ टिकतात. ते फ्रीज मध्ये ठेवणे म्हणजे स्वत:हून त्यांना खराब करणे होय हे लक्षात ठेवा.

हेही वाचा :  Kitchen Tips : जेवणात मीठ जास्त झालंय? मग गोंधळून जाऊ नका, करा 'हे' सोपे उपाय

(वाचा :- Omicron ला घेऊ नका अजिबात हलक्यात, शरीरातील हे महत्त्वाचे अवयव करतोय कायमचे निकामी, ताबडतोब सुरू करा ही 5 कामे)

शिमला मिरची कशी ठेवावी?

जर तुम्ही शिमला मिरची फ्रीज मध्ये ठेवत असाल तर ही सवय ताबडतोब बंद करा. कारण, कमी तापमानात शिमला मिरचीची स्कीन मऊ होते आणि तिच्यातील कुरकुरीतपणा गमावला जातो. ज्यामुळे शिमला मिरचीची चव पूर्णपणे नष्ट होते. शिमला मिरची ही अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते. पण गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टाने फ्रीज मध्ये ठेवली जाते. व ती ताजी राहण्यापेक्षा खराब होते व त्याची क्वालिटी खूप उतरते.

(वाचा :- Food for Strong Bones: हाडांचा संपूर्ण भुगा होईपर्यंत बघू नका वाट, ताबडतोब घरी आणा या 6 गोष्टी आणि बघा कमाल.!)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

दीपिका पादुकोणच्या न्युट्रिशनिस्टने दिली माहिती..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …