ICAI CA मे-जून परीक्षांसाठी नोंदणी विंडो पुन्हा खुली

ICAI CA May June Exams 2022: इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI) ने मे-जून परीक्षांसाठी नोंदणी विंडो पुन्हा उघडली आहे. सीए फाउंडेशन, फायनल आणि इंटरमिजिएट मे-जून परीक्षेसाठी(ICAI CA Foundation, Final, Intermediate application window) नोंदणी विंडो २६ मार्च २०२२ पासून सुरू होत आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या परीक्षेसाठी अर्ज केला नसेल ते त्यांचे नवीन खाते तयार करून icai.org वर स्वतःची नोंदणी करू शकतात. यासाठी त्यांना जन्मतारीख, ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल. उमेदवारांना नोंदणीसाठी ३० मार्च २०२२ पर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना दुसरी संधी दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.

ICAI ने या संदर्भात अधिकृत नोटीसमध्ये दिलेल्या माहितनीनुसार, ‘चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन, फायनल, इंटरमीडिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट( International Taxation Assessment Test, INTT AT) साठी अर्ज भरण्यासाठी पुन्हा ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

चार्टड अकाऊंट परीक्षांसाठी मे/जून २०२२ साठी शहर/ग्रुप/मीडियम बदलू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर हे बदल करता येणार आहेत. यासाठी ३० मार्च २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांसाठी मे/जून २०२२ च्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. त्याचबरोबर या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा :  IIT JAM 2022 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर, 'येथे' तपासा

MAH LLB CET 2022: महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु
सीए फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) मे सीए फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आयसीएआयकडून अधिकृत वेबसाइटवर नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मे सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये (CA Foundation exam 2022) बसलेल्या सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट icai.org वर वेळापत्रक तपासता येणार आहे. परीक्षेच्या तारखा बदलल्याचे कारणही संस्थेने नोटीसमध्ये दिले आहे.

RailTel Recruitment: रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती
सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२ चे वेळापत्रक आणि आयसीएसई टर्म २ परीक्षा २०२२ चे वेळापत्रक रिलीज झाल्यामुळे परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्याचे आयसीएआयने म्हटले आहे.

मुंबईतील स्मॉल कॉज कोर्टात ७ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
सीए फाउंडेशन परीक्षा २०२२ या मे महिन्याच्या २५, २७ आणि २९ तारखेला होणार होत्या. पण सीबीएसई टर्म २ (२०२१-२२) आणि आयसीएसई टर्म २ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
VSI Recruitment 2022: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भरती, १ लाख ८४ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …