‘मला अजूनही विश्वास होत नाही’, वर्ल्ड कप जिंकल्यावर मेस्सीनं शेअर केली भावूक पोस्ट

Fifa World Cup 2022 Final : अर्जेंटिना संघाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीने अखेर आपल्या संघाला फिफा विश्वचषक (Fifa WC) जिंकवून दिला. फायनलमध्ये (Fifa World Cup 2022 Final) फ्रान्सवर रोमहर्षक विजय मिळवत अर्जेंटिना चॅम्पियन बनला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात मेस्सीनेच अप्रतिम कामगिरी केली. ज्यानंतर आता आपल्या संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर मेस्सीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये मेस्सीनं लिहिलं आहे की, ‘मी विश्चचषक विजयाचं स्वप्न अनेक वेळा पाहिलं, मला ही गोष्ट इतकी मनापासून हवी होती की, मला अजूनही विश्वास होत नाही. मी माझ्या कुटुंबाचे, ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आम्ही पुन्हा एकदा दाखवून देतो की अर्जेंटिना जेव्हा आम्ही एकत्र लढतो आणि एकत्र येतो तेव्हा आम्ही जे करायचे ते साध्य करतोच. हे संपूर्ण टीमचे यश आहे जे कोणत्याही व्यक्तीपेक्षा वरचढ आहे. हीच आमची ताकद होती त्याच स्वप्नासाठी आम्ही लढलो, हेच स्वप्न अर्जेंटिनाचे होते. आम्ही ते पूर्ण करुन दाखवले’.  

हेही वाचा :  Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, 'हा' नियम मोडणार

मेस्सीची इन्स्टाग्राम पोस्ट-

News Reels


अर्जेंटिनाचा रोमहर्षक विजय

फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला.  

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …