Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, ‘हा’ नियम मोडणार

Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez : जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. काही काळापूर्वीच रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लब सोडला होता. अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यावर रोनाल्डो सौदी अरेबियामध्ये पोहोचला आहे. या क्लबसोबत करार केल्यानंतर रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत (Georgina Rodriguez) सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. यावेळी रोनाल्डो सौदीतील नियम मोडणार आहे. सौदी अरेबियाच्या नियमांनुसार, लग्नाशिवाय कोणीही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकाच घरात राहू शकत नाही.

रोनाल्डोला शिक्षा होणार?

या प्रकरणात, रोनाल्डोला शिक्षा होणार नाही. कारण रोनाल्डोची गणना जगातील सर्वात महान खेळाडूंमध्ये केली जाते. स्पॅनिश न्यूज एजन्सी EFE च्या मते, रोनाल्डोला त्याच्या विशेष दर्जामुळे सौदीतील नियम मोडल्यावरही शिक्षा होणार नाही. सौदी अरोबियातील वकिलांनी सांगितले की, येथील अधिकारी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास इच्छूक नाहीत.

एका वकिलाने सांगितले की, ‘सौदी अरेबियातील कायद्यानुसार लग्नाशिवाय पुरुष आणि महिलेला एकत्र राहण्यास मनाई आहे. असे असले तरी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या नियमाकडे डोळेझाक केली आहे. या नियमाचा वापर गुन्ह्यांच्या वेळी केला जातो.’ दुसर्‍या एका वकिलाने या प्रकरणाबद्दल सांगितले की, ‘सौदी अरेबियाचे अधिकारी परदेशी नागरिकांच्या बाबतीत हस्तक्षेप करत नाहीत, परंतु कायद्यानुसार विवाह न करता एकत्र सहवास करण्यास मनाई आहे.’

हेही वाचा :  IND vs WI : वेंकटेश अय्यरची टीम इंडियात स्थान पक्कं? कोच राहुल द्रविड म्हणतो...

रोनाल्डो आणि गर्लफ्रेंड जॉर्जिनाला चार मुले

रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज यांना देखील चार मुले आहेत. जुळ्या मुलांची नावे बेला आणि अलाना आहेत. याशिवाय रोनाल्डला ख्रिस्तियानो ज्युनियर आणि इव्हा अँड माटेओ नावाची मुले आहेत. रोनाल्डो आणि जॉर्जिना यांची भेट 2016 मध्ये झाली होती, जेव्हा रोनाल्डो रियल माद्रिदकडून खेळत होता. 

live reels News Reels

रोनाल्डोचा वर्षाला 800 कोटी कमवणार

ख्रिस्तियानो रोनाल्डो काही दिवसांपूर्वी मँचेस्टर युनायटेड क्लबपासून वेगळा झाला, ज्यानंतर आता तो सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर या क्लबसोबत तो जोडला गेला आहे. रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. रोनाल्डोने तब्बल 200 मिलियन युरोजचा हा करार केला आहे, त्यामुळे भारतीय रुपयांनुसार तो वर्षाला जवळपास 800 कोटी कमवणार आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …